वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसचा प्रादेशिक पक्षांवर विश्वास आहे. प्रादेशिक पक्षांनी देखील काँग्रेसवर विश्वास ठेवला पाहिजे. सोनिया गांधी सर्व विरोधकांची एकजूट करू इच्छितात, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी आज “राजकीय जवळीक” साधली. Sonia ji invited me for tea, Rahul ji was also there, We discussed the political situation in general, Pegasus & COVID situation and also discussed the unity of opposition.
ममता बॅनर्जी सध्या राजधानी दिल्लीच्या राजकीय दौर्यावर असून त्या सर्व विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यातली सर्वात महत्वाची भेट आज झाली. ममतांनी 10 जनपथ येथे जाऊन सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी राहुल गांधी देखील उपस्थित होते.
या भेटीनंतर पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या एकजुटी संदर्भात आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, की सोनियाजींनी मला दुपारच्या चहासाठी बोलवले होते. आम्ही बर्याच दिवसांनी एकत्र भेटलो. कोरोनापासून सर्व विषयांवर चर्चा केली. विरोधी पक्षांच्या ऐक्यावर देखील आमची सकारात्मक चर्चा झाली. त्यांना सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे वाटते आहे. भविष्यात याचे सकारात्मक परिणाम दिसतील अशी मला आशा वाटते.
It is essential for everyone to come together in order to defeat BJP…Alone, I am nothing – everyone will have to work together. I am not a leader, I am a cadre. I am a person from the street: West Bengal CM & TMC leader Mamata Banerjee when asked if she will lead the Opposition pic.twitter.com/3AylKRJd75 — ANI (@ANI) July 28, 2021
It is essential for everyone to come together in order to defeat BJP…Alone, I am nothing – everyone will have to work together. I am not a leader, I am a cadre. I am a person from the street: West Bengal CM & TMC leader Mamata Banerjee when asked if she will lead the Opposition pic.twitter.com/3AylKRJd75
— ANI (@ANI) July 28, 2021
भाजप आज संपूर्ण देशात एक प्रबळ पक्ष आहे. देशात एकपक्षीय राजवट असावी, असा त्यांचा मनसूबा आहे. साम-दाम-दंड-भेद अशी सर्व प्रकारची हत्यारे वापरून त्यांना पक्ष वाढवायचा आहे. अशावेळी विरोधकांनी गांभीर्यपूर्वक एकत्र येऊन पर्याय निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. सोनिया गांधी यांना देखील विरोधी पक्षांची एकजूट हवी आहे. काँग्रेस प्रादेशिक पक्षांवर विश्वास ठेवते आहे. देशातल्या प्रादेशिक पक्षांनी देखील काँग्रेसवर विश्वास ठेवला पाहिजे, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसपासून फटकून राहणाऱ्या किंवा काँग्रेसबरोबर राहूनही त्या पक्षाशी दगाबाजी करणाऱ्या नेत्यांची कान उघाडणी केली.
Sonia ji invited me for tea, Rahul ji was also there, We discussed the political situation in general, Pegasus & COVID situation and also discussed the unity of opposition. It was a very good meeting. I think the positive result must come out in the future: WB CM Mamata Banerjee pic.twitter.com/jIXFnR78qo — ANI (@ANI) July 28, 2021
Sonia ji invited me for tea, Rahul ji was also there, We discussed the political situation in general, Pegasus & COVID situation and also discussed the unity of opposition. It was a very good meeting. I think the positive result must come out in the future: WB CM Mamata Banerjee pic.twitter.com/jIXFnR78qo
पेगासस पासून सर्व मुद्द्यांवर ममता बॅनर्जी यांनी परखड भाष्य केले. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर हेरगिरी केली जात असेल तर केंद्र सरकारवर विरोधी पक्षांचा विश्वास कसा बसेल?, असा सवाल त्यांनी केला. पेगासस मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली तपास आणि चौकशी झाली पाहिजे अशी आग्रही मागणी ममता बॅनर्जी यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App