वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व मोबाईल फोन उत्पादकांना सांगितले आहे की प्रत्येक मोबाईल फोनमध्ये एफएम रेडिओ रिसीव्हर किंवा फीचर अनिवार्यपणे उपलब्ध असावे. कोणत्याही मोबाइलमधील अंगभूत एफएम रेडिओ फीचर कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.Central government notice to mobile manufacturers, FM radio mandatory in mobiles, cannot disable it
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व मोबाइल फोन उत्पादकांना जारी केलेल्या सल्ल्यात म्हटले आहे की, ‘एफएम रेडिओ ही एक विश्वासार्ह प्रणाली आहे. एफएम स्टेशन नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्थानिक अधिकारी आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सरकारला रिअल टाइममध्ये माहिती देणे एफएम रेडिओशिवाय शक्य नसते.
मंत्रालयाने इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) आणि मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (MAIT) यांना हा महत्त्वाचा सल्ला सर्व उद्योग संघटना आणि मोबाइल फोन उत्पादकांना प्राधान्याने पोहोचवण्यास सांगितले आहे.
केंद्राने या सल्ल्यात इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) चाही हवाला दिला आहे. रेडिओ प्रसारण हा नैसर्गिक आपत्तीमध्ये लवकरात लवकर चेतावणी देण्याचा आणि जीव वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. कोरोना महामारीच्या काळात महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात रेडिओची मोठी मदत झाली.
एफएम चॅनेलमुळे सर्वांना विनामूल्य संगीत ऐकायला मिळते, त्यामुळे ते अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते असे उद्योग तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत एफएम रेडिओच्या श्रोत्यांची संख्या वाढवण्यासही या सल्ल्याची मदत होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App