विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेस प्रणित INDI आघाडी फुटत असताना काँग्रेसच्या हायकमांडने त्यातला राजकीय धोका ओळखून आपल्या सर्व बड्या नेत्यांसाठी, विशेषतः गांधी परिवारातील नेत्यांच्या लोकसभेच्या जागा “सुरक्षित” करण्याच्या दृष्टीने शांतपणे पावले उचलायला सुरुवात केली आहे.Sonia Gandhi fears defeat in raibareli in 2024 loksabha elections, she may contest from telangana
यातलेच पहिले पाऊल म्हणून राहुल गांधींपाठोपाठ सोनिया गांधींनी देखील उत्तर प्रदेशातून बाजूला व्हायची तयारी चालवल्याची चिन्हे दिसत आहेत. सोनिया गांधी यांच्या ऐवजी उत्तर प्रदेशातून रायबरेली मतदारसंघात प्रियांका गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवून स्वतः सोनिया गांधी तेलंगण मधून एखाद्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी प्रदेश काँग्रेसमध्ये सोनिया गांधींना निमंत्रण देण्याचा प्रस्ताव पारित करून घेतला आहे. सोनिया गांधी यांनी तेलंगणातला त्यांना हवा तो मतदारसंघ निवडावा, त्या लोकसभेवर तेलंगणातून निवडून जातील, असा विश्वास या प्रस्तावात रेवंत रेड्डी आणि तेलंगणा काँग्रेसने व्यक्त केला आहे.
पण केवळ प्रस्ताव पारित करण्यापुरती ही बाब मर्यादित नाही. त्यापलीकडे एक गंभीर राजकीय बाब त्यात दडली आहे, ती म्हणजे, लोकसभा निवडणूक अधिकृतरित्या जाहीर होण्यापूर्वी INDI आघाडीतले वेगवेगळे घटक पक्ष बाजूला होऊन ती आघाडी फुटत आहे. उत्तर प्रदेशातून समाजवादी पार्टी INDI आघाडीतून बाजूला झाली आहे. अर्थात INDIही फूट प्रामुख्याने उत्तर आणि पूर्व भारतात होत आहे. काँग्रेससाठी तिथे वाईट परिस्थिती आहे. यातून सोनिया गांधीं सारख्या सर्वोच्च नेत्याला रायबरेलीत “धोका” उत्पन्न होऊ शकतो, याचा अंदाज काँग्रेस हायकमांडला आला आहे.
पण त्या तुलनेत दक्षिणेतून काँग्रेसची मात्र तितकीशी वाईट बातमी नाही आणि अवस्थाही तितकी वाईट नाही. काँग्रेसने तेलंगणात विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आंध्र प्रदेशात मोठी खेळी करून तिथले मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांचा प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून घेतला. त्यांना आंध्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केले आणि तिथे मूळ काँग्रेसची ताकद वाढवली.
दक्षिणेतल्या राज्यांमध्ये काँग्रेस आज भाजप पेक्षा निश्चित मजबूत अवस्थेत आहे. कर्नाटकात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार फुटण्याची चर्चा असली तरी तिथे आजही काँग्रेसचेच सरकार अस्तित्वात आहे. तामिळनाडूतल्या डीएमके सरकार मध्ये काँग्रेस सामील आहे. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफ डाव्या पक्षांशी टक्कर घेत आहे, तर तेलंगण आणि आंध्रामध्ये काँग्रेसने आपली स्थिती मजबूत करून घेतली आहे. त्यामुळे काँग्रेससाठी दक्षिणेतल्याच राज्यांमध्ये आपल्या बड्या नेत्यांसाठी उत्तरेच्या तुलनेत “सुरक्षित” मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनेच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सोनिया गांधींनी तेलंगणातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे.
2019 च्या निवडणुकीत अमेठी मध्ये “धोका” उत्पन्न होऊ शकतो याचा अंदाज काँग्रेस हायमांडला आला होता. त्यामुळेच हायकमांडने राहुल गांधी यांच्यासाठी अमेठी बरोबरच केरळ मधला वायनाड हा “सुरक्षित” मतदारसंघ शोधला होता. त्यामुळे ते अमेठी मधून हरले तरी वायनाड मधून “सुरक्षितपणे” लोकसभेत पोहोचू शकले होते. आता हीच “राजकीय सुरक्षा व्यवस्था” सोनिया गांधी यांच्यासाठी तेलंगण मधून करण्याची राजकीय चतुराई काँग्रेस हायकमांड दाखवत आहे. अर्थात त्याला 2019 सारखे वायनाड मधले यश मिळते, की तेलंगणामध्ये देखील सोनिया गांधींसाठी 2019 ची “अमेठी” तयार होते??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App