विशेष प्रतिनिधी
लेह : Sonam Wangchuk : लेहमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी सरकारने जबाबदार धरल्यानंतर लडाखी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या हिंसाचारानंतर लेहमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालये शनिवारपर्यंत बंद आहेत.
Sonam Wangchuk
लेहमध्ये पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनादरम्यान हिंसाचार उसळला. यात चार तरुणांचा मृत्यू झाला आणि ४० पोलिस अधिकाऱ्यांसह ८० जण जखमी झाले. आतापर्यंत ६० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात सरकारने वांगचुक यांच्यावर कडक कारवाई सुरू केली आहे. गृह मंत्रालयाने वांगचुक यांच्या संस्थेचा, स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (SECMOL) परकीय निधी परवाना रद्द केला आहे. परदेशी अनुदान किंवा देणग्या मिळविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना परकीय योगदान (नियमन) कायद्याअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. संस्थेने निधीचा गैरवापर केल्याचे आढळून आले. सीबीआयने वांगचुक यांच्या मालकीच्या आणखी एका एनजीओ, हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज लडाख (एचआयएएल) विरुद्ध परदेशी निधी (एफसीआरए) चौकशी सुरू केली आहे. एचआयएएलवर परदेशी योगदान कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. सीबीआय टीम एनजीओचे खाते आणि रेकॉर्ड तपासत आहे. सीबीआय चौकशीवर संताप व्यक्त करताना वांगचुक म्हणाले., सीबीआयला फक्त २०२२ ते २०२४ पर्यंतच्या खात्यांची तपासणी करायची होती, पण ते आता २०२० आणि २०२१ मधील नोंदी तपासत आहेत. तक्रारीव्यतिरिक्त शाळांकडूनही कागदपत्रे मागवली जात आहेत.स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला. कामगारांना वेतन न दिल्याचा आरोप करणारी चार वर्षांपूर्वीची जुनी तक्रारही पुन्हा उघडण्यात आली आहे. मला आयकर विभागाकडूनही एक नोटीस मिळाली आहे आणि आता सीबीआय चौकशी सुरू आहे. लडाखमध्ये कोणताही कर नाही, तरीही मी स्वेच्छेने कर भरतो. असे असूनही, नोटीस पाठवल्या जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App