विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीवर काही मुस्लिम संघटनांनी बहिष्कार घातला. त्यावरून केंद्रीय मंत्री चिराग पासवान Chirag paswan यांनी त्या मुस्लिम संघटनांना बोचरे सवाल केले.
नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने Waqf सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिल्याचा कांगावा करत बिहार मधल्या काही मुस्लिम संघटनांनी इफ्तार पार्टीवर बहिष्कार घातला. त्यामध्ये इमारत शरिया, जमाते इस्लामी, जमात अहले हदीस, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, खान्काह मोजीबिया, खान्काह रहमानी, जमीयत उलेमा ए हिंद या संघटनांचा समावेश होता. पण तरी देखील मुस्लिम समाजातले बाकीचे घटक त्या पार्टीत सामील झाले होते.
त्या पार्टीत सामील झालेल्या केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी इफ्तार पार्टीवर बहिष्कार घालणाऱ्या मुस्लिम संघटनांना बोचरे सवाल केले. आज मुस्लिमांचे ठेकेदार म्हणून समाजात वावरणाऱ्या नेत्यांनी मुस्लिमांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी काय केल??, त्या सवालाचे उत्तर नीतीश कुमार यांच्या इफ्तार पार्टीवर बहिष्कार घालणाऱ्यांनी द्यावे, असे चिराग पासवान म्हणाले. ज्या मुस्लिम संघटनांनी नितीश कुमार यांच्या इफ्तार पार्टीवर बहिष्कार घातला, त्या संघटनांचे म्होरके लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला हजर राहून त्यांच्या पुढे पुढे करत होते, असा टोलाही चिराग पासवान यांनी हाणला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App