विशेष प्रतिनिधी
जम्मू :भारतीय सैनिक सामान्य नागरिकांची मदत करण्यासाठी स्वत:च्या जीवाचीही पर्वा करत नाही. याचेच एक उदाहरण सीमेवर घडले. कडाक्याच्या थंडीत बर्फवृष्टी होत असताना जवानांनी एका गरोदर महिलेला 6 किलोमीटर दूर चालत आपल्या खांद्यावर उचलून रुग्णालयात नेले.Soldiers carry pregnant woman on their shoulders and walk six kilometers to hospital
शनिवारी सीमेजवळ घग्गर हिल गावात राहत असलेल्या एका गरोदर महिलेची प्रकृती खालावली होती. प्रचंड बर्फवृष्टीमुळे आणि गोठवणाºया थंडीत वाहनेही उपलब्ध नसल्याने आता करायचं काय, असा प्रश्न या महिलेला पडला होता. याबाबतची माहिती जेव्हा सीमाभागातील जवानांना समजली, तेव्हा त्यांनी या महिलेला आपल्या खांद्यावर उचलून सहा किलोमीटर बफार्तून प्रवास केला
आणि रुग्णालयात पोहोचवलं.पायी रुग्णालयात पोहोचवलेल्या या महिलेला वेळीच उपचार मिळाले. त्यामुळे या महिलेच्या कुटुंबीयांनीही जवानांचे मनापासून आभार मानलेत. अत्यंत वेगान यावेळी बर्फवृष्टी होत होती. मात्र तुफान बर्फवृष्टीची पर्वा न करता जवानांनी चोख कामगिरी बजावत पहिलेला पायीच बफार्तून रुग्णालयात पोहोचवलं.
योग्यवेळी ही जवानांनी केलेली मदत या महिलेला मिळाली नसती, तर कदाचित अनर्थ घडला असता. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर जवानांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना कडक सॅल्यूट अनेकांनी आपल्या कमेंटमधून दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more