विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Solapur fire tragedy सोलापूरमधील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात भीषण आग लागून आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेत मृतांना आणि जखमींना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.Solapur fire tragedy
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील सोलापूर येथे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीने अतिशय दुःख झाले आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांप्रती सहवेदना. तसेच जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपयांची मदत दिली जाईल, तर जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल.”
ही भीषण आग रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास लागली होती. कारखान्यातील धुरामुळे आणि आगीच्या भडकाामुळे बचाव कार्यास मोठा अडथळा निर्माण झाला. सायंकाळी चारच्या सुमारास कारखान्याच्या आतील भागातून पाच मृतदेह सापडले. आग एवढी प्रचंड होती की अग्निशमन दलाला भिंती फोडून मृतदेह बाहेर काढावे लागले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
सुमारे बारा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. संपूर्ण कारखाना जळून खाक झाला असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य राबवले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App