जेडीएस आणि काँग्रेस कर्नाटकच्या विकासात सर्वात मोठा अडथळा, असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक राज्यातील कोलार येथे जाहीर सभेला संबोधित केले. येथे पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या ‘विषारी साप’ या विधानावर पंतप्रधानांनी नाव न घेता म्हटले की, ‘साप हा भगवान शिवाच्या गळ्यातील अलंकार आहे आणि माझ्यासाठी तर देशातील जनता भगवान शिवासारखी आहे. Snake is the ornament of Lord Shankars neck Prime Minister Modi’s strong response to Khareges criticism
पंतप्रधान मोदी म्हणाले, ”कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा सर्वात मोठा मुद्दा साप आहे. माझी तुलना हे लोक सापाशी करत आहेत. मात्र साप भगवान शंकराच्या गळ्यातील शोभा आहे आणि माझ्यासाठी देशातील जना ईश्वराप्रमाणे आहे, शंकराचेच रूप आहे. त्यामुळेच ईश्वररूपी जनतेच्या गळ्यातील साप होणं मला मान्य आहे.”
याचबरोबर कर्नाटकची ही निवडणूक केवळ आमदार, मंत्री किंवा येत्या पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवण्याची निवडणूक नाही, ही निवडणूक येत्या २५ वर्षात विकसित भारताच्या रोडमॅपचा पाया मजबूत करणारी निवडणूक आहे. असे पंतप्रधान म्हणाले.
कर्नाटक के चुनाव में कांग्रेस का सबसे बड़ा मुद्दा सांप है। मेरी तुलना ये लोग सांप से कर रहे हैं। लेकिन सांप भगवान शंकर के गले की शोभा है और मेरे लिए देश की जनता ईश्वर का रूप है, शिव का ही स्वरूप है, इसलिए ईश्वर रूपी जनता के गले का सांप होना भी मुझे स्वीकार है। – पीएम… pic.twitter.com/usIwIBsx6L — BJP (@BJP4India) April 30, 2023
कर्नाटक के चुनाव में कांग्रेस का सबसे बड़ा मुद्दा सांप है। मेरी तुलना ये लोग सांप से कर रहे हैं।
लेकिन सांप भगवान शंकर के गले की शोभा है और मेरे लिए देश की जनता ईश्वर का रूप है, शिव का ही स्वरूप है, इसलिए ईश्वर रूपी जनता के गले का सांप होना भी मुझे स्वीकार है।
– पीएम… pic.twitter.com/usIwIBsx6L
— BJP (@BJP4India) April 30, 2023
पंतप्रधान म्हणाले, ‘२०१४ पूर्वी काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराच्या काळात जगाने भारताकडून सर्व आशा सोडल्या होत्या. पण आज भारताची प्रतिष्ठा उंचावर आहे, अर्थव्यवस्थेचा वेग वेगवान आहे आणि जग भारताला एक उज्ज्वल स्थान म्हणून संबोधत आहे. याशिवाय कर्नाटकच्या विकासात जेडीएस आणि काँग्रेस सर्वात मोठा अडथळा आहे आणि आज येथे जमलेली गर्दी या दोन्ही पक्षांची निद्रानाश करणारी आहे, ज्यांना कर्नाटकची जनता क्लीन बोल्ड करेल. असं मोदींनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App