विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपुरम : Vizhinjam port च्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती गौतम अदानी, केरळचे कम्युनिस्ट मुख्यमंत्री पिनराई विजयन त्याचबरोबर काँग्रेसचे खासदार शशी थरूर एकत्रित उपस्थित होते. त्यामुळे INDI आघाडीतल्या अनेकांची झोप उडाली असल्याची टिप्पणी पंतप्रधान मोदींनी त्या उद्घाटन कार्यक्रमात केली.
केरळ मधला विंझिजम पोर्ट अदानी समूहाने विकसित केला असून त्याचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याबरोबरच मुख्यमंत्री पिनराई विजयन, उद्योगपती गौतम अदानी काँग्रेसचे खासदार शशी थरूर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर आदी नेते एका व्यासपीठावर उपस्थित होते. सध्याच्या राजकीय वैरभावाच्या पार्श्वभूमीवर विकास कामाच्या उद्घाटनासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रमुख नेते एकत्रित उपस्थित राहिल्याचे वेगळे चित्र कम्युनिस्ट राजवट असलेल्या केरळमध्ये दिसले.
विशेषत: राहुल गांधी रोज अदानी आणि अंबानी यांच्या विरोधात वाटेल ते बडबडत असताना केरळच्या कम्युनिस्ट राजवटीने अदानी समूहाला विंझिझम पोर्ट विकसित करायला दिला. त्यासाठी सहकार्य केले. त्याच्या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलाविले. त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात काँग्रेसचे आणि भाजपचे नेते एकाच स्टेजवर दिसले. या अनोख्या राजकीय घटनेचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये केला. केरळ मधल्या कम्युनिस्ट पार्टीचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे “इंडी” आघाडीतले महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्याबरोबरच काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे माझ्याबरोबर उद्घाटन समारंभात उपस्थित आहेत हे पाहून अनेकांच्या रात्रीच्या झोपा उडतील. हा मेसेज ज्यांना पोहोचायचा तो पोहोचला, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाचेही नाव न घेता हाणला. मोदींच्या या टोल्याला पिनराई विजयन आणि शशी थरूर यांनी हसून दाद दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App