वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात दरवर्षी लाखो लोकांचा मानवी चुकांमुळे होणाऱ्या अपघातात मृत्यू होतो. हे अपघात आणि मृत्यू टाळण्यासाठी व्यावसायिक आणि अन्य वाहनांमध्ये चालकाला झोप येत असेल तर तशी सूचना देणारे सेन्सर बसविण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. sleep detection sensors in commercial vehicles nitin gadkari on road accidents
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, केंद्र सरकार याबाबत ठोस निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. व्यवसायिक ट्रक चालकांचा वाहन चालवण्याचा वेळ निश्चित हवा, असे सांगताना गडकरींनी विविध मुद्यावर लक्ष्य वेधले. व्यवसायिक वाहनांच्या चालकाला झोप आल्यास त्याची माहिती देणारं सेन्सर लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
वैमानिकांसाठी जसे विमान उड्डाणाचे तास ठरलेले असतात. त्याचप्रमाणे चालकांसाठी ट्रक चालवण्याचे तास निश्चित हवेत. चालक दमल्यामुळे होणारे अपघात टाळतील, असं गडकरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘युरोपियन मापदंडानुसार व्यवसायिक वाहनांमध्ये सेन्सर लावण्याच्या धोरणावर काम करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. या सेन्सरमुळे चालकाला झोप येत असेल, तर त्याची माहिती मिळते,’ असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App