हवाई दलाच्या वाहनांवर हल्ले करणाऱ्या आरोपींचे स्केच जारी; शहीद जवान विकी पहाडेंवर अंत्यसंस्कार

वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शनिवारी हवाई दलाच्या वाहन ताफ्यांवर हल्ले करणाऱ्या दोन संशयित अतिरेक्यांचे स्केच सुरक्षा दलाने जारी केले आहेत. त्यासोबतच त्यांची माहिती देणाऱ्यांना २० लाख इनामही जाहीर करण्यात आला आहे.Sketch of accused who attacked Air Force vehicles released; Martyr Jawan cremated at Vicky Hills



या हल्ल्यात हवाई दलाचे जवान विकी पहाडे धारातीर्थी पडले होते, तर ४ जवानही जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी २० लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच हल्लेखोरांच्या शोधासाठी पूंछ भागातील डन्ना टॉप, शाहस्टारसह परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे.

दरम्यान, हल्ल्यात शहीद झालेले विकी पहाडे यांच्यावर सोमवारी मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील त्यांचे गाव नोनिया करबल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या हेलिकॉप्टरने नागपूरहून पहाडे यांचे पार्थिव शरीर छिंदवाडाच्या इमलीखेडा विमानतळावर आणण्यात आले. या ठिकाणी सलामी देण्यात आली होती.

Sketch of accused who attacked Air Force vehicles released; Martyr Jawan cremated at Vicky Hills

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात