विशेष प्रतिनिधी
अमरावती : आंध्र प्रदेशातील एलुरु येथील अक्कीरेड्डीगुडेम येथे बुधवारी रात्री एका रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले. Six killed in chemical factory fire
नायट्रिक अॅसिड मोनोमिथाइलच्या गळतीनंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी विजयवाडा येथे रेफर करण्यात आले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पोरस इंडस्ट्रीच्या युनिट ४ मध्ये रात्री १० वाजता स्फोट झाला आणि त्यानंतर मोठी आग लागली. त्यावेळी कारखान्यात सुमारे दीडशे लोक काम करत होते. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App