वृत्तसंस्था
श्रीनगर : दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून जम्मू-काश्मीरमध्ये सहा सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. यात दोन पोलिसांचा समावेश आहे. हे कर्मचारी हस्तक (ओव्हरग्राऊंड वर्कर्स) म्हणून सक्रिय होते. six govt. employs sacked in Kashmir
याआधी जुलै महिन्यात ११ सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. यात हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाहउद्दीन याच्या मुलाचा व पोलिस खात्यातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. चौकशीशिवाय कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार सरकारला आहे. अध्यक्ष किंवा राज्यपालांना उचित वाटल्यास, निर्णय राज्याच्या हिताचा असल्याची खात्री पटल्यास चौकशी करण्याची आवश्यकता उरत नाही.
केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नियमित चारित्र्य तसेच पूर्ववर्ती वर्तनाची पडताळणी याविषयी सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागातील प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला भारत देश आणि घटनेविषयी निरपेक्ष कटिबद्धता, प्रामाणिकपणा आणि निष्ठा दाखविणे बंधनकारक आहे. सरकारी नोकर म्हणून अनुचित ठरेल अशी कोणतीही गोष्ट त्याने करता कामा नये असाही दंडक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App