वृत्तसंस्था
नागपूर : आठ आसनी वाहनात सहा एअरबॅग अनिवार्य असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. Six airbags mandatory in an eight-seater vehicle; Information from Union Minister Nitin Gadkari
NITIN GADKARI : NH48 मुंबई- दिल्ली 12 तासात ; नितीन गडकरी यांची महत्वकांक्षी योजना
भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने १ जुलै २०१९ पासून चालकासाठी आणि १ जाने २०२२ पासून चालकाशेजारी बसलेल्या सहप्रवाशाला एअरबॅग उपल्बध करून देणे कंपन्याना अनिवार्य केले होते. वाहनाने पुढील बाजूने धडक दिली तर पुढील व्यक्तींना दुखापत होऊ नये तसेच त्यांचे प्राण वाचावेत, हा त्या मागचा उद्देश होता.
आता मागील प्रवाशांची सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे. आता एम-१ वाहन श्रेणीमध्ये ४ अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णयही घेतल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App