विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी सुरु केलेल्या उपाययोजना इतक्यात मागे घेण्याचा भारत सरकारचा कोणताही विचार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. देशाचा शाश्व,त विकास व्हावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.Sitaraman bats for economic reforms
या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 9.5 टक्के असेल, असा रिझर्व्ह बँकेबरोबरच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचाही अंदाज आहे. मात्र, हे साध्य करण्यात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि कोळशाची कमतरता हे अडथळे येऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
निर्मला सीतारामन या सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. येथे एका मुलाखतीदरम्यान बोलताना त्या म्हणाल्या की, ‘‘कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत असल्याने मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठीच्या नियोजनात काही अडथळे येऊ शकतात. हा सामना किती काळ करावा लागेल आणि त्याचा इतर बाबींवर किती परिणाम होईल, याचा अंदाज नाही.
त्यामुळेच अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी सुरु केलेल्या उपाययोजना मागे घेण्याचा सध्या विचार नाही.’’ अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी निधीहीही तरतूद केली आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App