वृत्तसंस्था
नवी दिल्ली: Bangladeshi निवडणूक आयोग पुढील आठवड्यापासून देशभरात मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरीक्षण (SIR) सुरू करणार आहे. हा उपक्रम 10 ते 15 राज्यांमध्ये एकाच वेळी राबवला जाईल, ज्यात पुढील वर्षी निवडणुका होणाऱ्या आसाम, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगाल या राज्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या माध्यमातून मतदार यादीतील डुप्लिकेट नावे, बोगस मतदार आणि परदेशी घुसखोरांना वगळणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.Bangladeshi
आयोगातील सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या राज्यांमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, तिथे ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. निवडणुका संपल्यानंतरच त्या राज्यांमध्ये पुनरीक्षण सुरू होईल.Bangladeshi
एसआयआरच्या अंमलबजावणीसाठी आयोगाने नुकत्याच सर्व राज्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत दोन बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक मतदाराच्या घरी बीएलओ (Booth Level Officer) भेट देऊन पूर्व-भरलेले फॉर्म वितरित करतील. ३१ डिसेंबरपर्यंत १८ वर्षांचे होणारे नागरिकही या प्रक्रियेत समाविष्ट होतील.
भारतामध्ये सध्या एकूण ९९.१ कोटी मतदार आहेत, त्यापैकी बिहारमधील ८ कोटींची पडताळणी पूर्ण झाली आहे. २००२ ते २००४ या कालावधीत सुमारे ७० कोटी मतदारांची नोंदणी झाली होती, त्यामुळे उर्वरित मतदारांकडून आवश्यक कागदपत्रे मागवली जाणार आहेत.
आयोगाच्या सूत्रांनुसार, या पुनरीक्षणाचा मुख्य उद्देश बांगलादेश आणि म्यानमारमधून आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना ओळखून त्यांना मतदार याद्यांमधून काढून टाकणे आहे. विशेषतः आसाम, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये ही प्रक्रिया अधिक काटेकोरपणे होणार आहे.
गेल्या दोन दशकांतील शहरीकरणामुळे मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उत्तर प्रदेश: २००३ मध्ये ११.५ कोटी, आता १५.९ कोटी मतदार. आहेत. आंध्र प्रदेश: २००३ मध्ये ५.५ कोटी, आता ६.६ कोटी मतदार. दिल्ली: २००८ मध्ये १.१ कोटी, आता १.५ कोटी मतदार आहेत. या वाढत्या आकड्यांमुळे मतदार याद्यांचे पुनरावलोकन आवश्यक असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.
आरंभी एससी, एसटी आणि ओबीसी वर्गासाठी आरक्षण निश्चित केले जाईल. सर्वसाधारण निवडणुकीसाठी आरक्षित जागांची मंजुरी राज्यनिहाय आयोगाकडून घेतली जाईल. प्राथमिक आराखडा तयार करून सार्वजनिक आक्षेप मागवले जातील. अंतिम याद्या राजपत्रात प्रसिद्ध केल्या जातील.
आयोगाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर मतदार यादीत चुकीचे नाव, पत्ता किंवा पुनरावृत्ती दिसली तर त्वरित निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा. सर्व फॉर्म आणि तपशील राज्य निवडणूक आयोगांच्या वेबसाइटवर उपलब्ध राहतील.
“मतदार याद्यांची अचूकता ही लोकशाहीच्या विश्वसनीयतेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे आणि खोट्या नोंदी दूर करण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App