प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटक काँग्रेस मधला मुख्यमंत्री पदाचा पेच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मिटवल्याचे मानले जात आहे. सिद्धरामय्या यांच्याकडे पुन्हा एकदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे काँग्रेस श्रेष्ठींनी सोपवली आहेत. पण त्यातूनच प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि 50 आमदारांचा पाठिंबा जाहीर करणारे जी. परमेश्वरन हे नेमके काय करणार??, असा सवाल तयार झाला आहे. Siddaramaiah Chief Minister of Karnataka
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर चार दिवसांनी मोठ्या मंथनानंतर सिद्धरामय्या यांच्या पारड्यात काँग्रेस श्रेष्ठींचा कौल गेला. यामागे सिद्धरामय्या यांची “पॉलिटिकल न्यूसन्स व्हॅल्यू” कामाला आल्याचे बोलले जात आहे. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केले नसते, तर ते स्वतःच “सचिन पायलट” बनवण्याच्या तयारीत असल्याची भीती काँग्रेस श्रेष्ठींना वाटल्याने त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली गेली.
#WATCH बेंगलुरु: कर्नाटक मुख्यमंत्री के नाम की घोषणा से पहले पूर्व मुख्यमंत्री और कांग्रेस नेता सिद्धारमैया के समर्थकों ने उनके आवास के बाहर जश्न मनाया। #KarnatakaCM pic.twitter.com/tkZstJktqA — ANI_HindiNews (@AHindinews) May 17, 2023
#WATCH बेंगलुरु: कर्नाटक मुख्यमंत्री के नाम की घोषणा से पहले पूर्व मुख्यमंत्री और कांग्रेस नेता सिद्धारमैया के समर्थकों ने उनके आवास के बाहर जश्न मनाया। #KarnatakaCM pic.twitter.com/tkZstJktqA
— ANI_HindiNews (@AHindinews) May 17, 2023
पण त्यामुळे काँग्रेसमध्ये दोन असंतुष्ट तयार झाले असून डी. के. शिवकुमार यांनी आपण साधे आमदारच राहू असे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे शिवकुमार यांची साथ सिद्धरामय्या यांना कितपत मिळेल याविषयी शंका तयार झाली आहे. त्याचबरोबर जी. परमेश्वरन हे माजी उपमुख्यमंत्री 50 आमदारांच्या पाठिंब्यासह मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत होते. ते आता कोणती भूमिका घेणार, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सिद्धरामय्या यांच्या पारड्यात काँग्रेस श्रेष्ठींनी आपले वजन टाकले असले तरी काँग्रेसचे सर्वच्या सर्व 135 आमदार त्यांच्याच पाठीशी असतील याची खात्री कोण देणार??, हा सवाल तयार झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App