2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी सिब्बल यांचा विरोधकांना सल्ला, भाजपशी स्पर्धेसाठी आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेस आवश्यक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, 2024 मध्ये भाजपशी लढणाऱ्या आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेस असणे आवश्यक आहे. मजबूत आघाडी करण्यासाठी विरोधी पक्षांनी संवेदनशील असणे आवश्यक आहे. तसेच, एकमेकांच्या विचारसरणीवर टीका करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. सिब्बल यांनी रविवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हे म्हटले.Sibal’s advice to opposition for 2024 Lok Sabha elections, Congress needs to be at the center of the alliance to compete with BJP

विरोधकांनो बोलण्यासाठी व्यासपीठ शोधा!!

कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकारला विरोध करणाऱ्या सर्व पक्षांनी आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ शोधण्याचे आवाहन केले. सिब्बल म्हणाले की, हे व्यासपीठ ‘इन्साफ के सिपाही’ वेबसाइटदेखील असू शकते, सिब्बल यांनी केंद्र सरकारच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हे व्यासपीठ सुरू केले आहे.



राज्यसभा खासदार म्हणाले की 2024 च्या विरोधी आघाडीच्या नेतृत्वाच्या प्रश्नाचे या टप्प्यावर उत्तर देण्याची गरज नाही. त्यांनी 2004 चे उदाहरणदेखील दिले, तेव्हा विरोधकांचा पंतप्रधान चेहरा ठरवला गेला नव्हता, तरीही लोकसभा निवडणुकीनंतर अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेतून बाहेर पडले होते.

शरद पवारांच्या वक्तव्यावर सिब्बल यांची प्रतिक्रिया

यादरम्यान कपिल सिब्बल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही चर्चा केली. तुम्ही मुद्दे कमी केलेत तर राजकीय पक्षांमध्ये मतभेद होतील, असे सिब्बल म्हणाले.

भारतातील क्रोनी कॅपिटलिझमबद्दल राहुल गांधींची काही दृष्टी असेल तर मला वाटते शरद पवार सुद्धा क्रॉनी कॅपिटलिझमशी संबंधित व्यासपीठाच्या विरोधात नसतील. विरोधकांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ हवे आहे.

शरद पवार यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार

सिब्बल म्हणाले की, वेगवेगळ्या पक्षांना वेगवेगळे विचार मांडण्याची परवानगी दिली पाहिजे. तसेच राहुल गांधी यांना कोणत्याही एका व्यक्तीबद्दल त्यांचे मत मांडण्याची मुभा असावी. शरद पवार यांनाही त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. याकडे विसंवादाचे उदाहरण म्हणून पाहिले जाऊ नये.

Sibal’s advice to opposition for 2024 Lok Sabha elections, Congress needs to be at the center of the alliance to compete with BJP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात