वृत्तसंस्था
शिमला : लोकशाहीत मतदानाचे पावित्र्य आणि निष्ठा जपणारे स्वतंत्र भारतातील पहिले मतदार श्याम सरण नेगी (First Indian Voter) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 106 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. श्याम सरण नेगी यांच्या मतदानाने लोकशाहीची सुरवात झाली होती. Shyam Saran Negi, the country’s first voter who preserved the sanctity and loyalty of voting, passed away at the age of 106.
नेगी यांनी काही दिवसांपूर्वीच आपले शेवटचे मतदानाचे कर्तव्य बजावले होते. हिमाचल प्रदेशच्या कल्पा गावचे ते रहिवासी होते. तीनच दिवसांपूर्वी दोन नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपले अखेरचे मतदान पोस्टल बॅलेट द्वारे केले होते. शाम सरण नेगी यांनी 33 निवडणुकांमध्ये मतदान केले होते.
हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील रहिवासी असलेल्या श्याम सरण नेगी यांनी 2 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी पोस्टल मतदान केले होते. त्यांनी आयुष्यात 33 वेळा मतदान केले. त्यांनी बॅलेट पेपरपासून ते ईव्हीएमपर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहिला.
स्वतंत्र भारत के पहले मतदाता 106 वर्षीय श्याम सरन नेगी का आज सुबह उनके पैतृक स्थान कल्पा में निधन हो गया। पूरे राजकीय सम्मान के साथ उनका अंतिम संस्कार किया जाएगा: DC किन्नौर, हिमाचल प्रदेश pic.twitter.com/RlDHlfHjY4 — ANI_HindiNews (@AHindinews) November 5, 2022
स्वतंत्र भारत के पहले मतदाता 106 वर्षीय श्याम सरन नेगी का आज सुबह उनके पैतृक स्थान कल्पा में निधन हो गया। पूरे राजकीय सम्मान के साथ उनका अंतिम संस्कार किया जाएगा: DC किन्नौर, हिमाचल प्रदेश pic.twitter.com/RlDHlfHjY4
— ANI_HindiNews (@AHindinews) November 5, 2022
1951 मध्ये केले होते पहिले मतदान
देशामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951 झाली. ही निवडणूक पाच महिने चालली होती. त्याध्ये भारताचे पहिले मतदार म्हणून श्याम सरण नेगी यांनी 25 ऑक्टोबर 1951 रोजी पहिल्यांदा मतदान केले होते. यानंतर त्यांनी एकाही निवडणुकीत आपला सहभाग सोडला नाही. मला माझ्या मताचे महत्त्व माहिती आहे, असे नेगी सांगायचे. शरीर साथ देत नसेल तर स्वबळाच्या जोरावर मला मतदानाला जायचे आहे. या निवडणुकीत माझे हे शेवटचे मतदान असू शकते, अशी भीतीही त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर शनिवारी (आज) सकाळी त्यांचे निधन झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App