श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा ही भारतवर्षाच्या पुनर्उभारणीची सुरुवात, कटुता संपवावी विशेष लेखाद्वारे सरसंघचालकांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अयोध्येत रामजन्मभूमीवरील मंदिरात श्री रामलल्लांची उद्या अभिजित मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा होत आहे. या निमित्ताने समाजातली कटुता, वाद आणि संघर्ष संपायला हवा, असे कळकळीचे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. दोन समाजांमधला हा वाद संपायला हवा हे सर्व समाजाने पाहायला हवे, असे भागवत यांनी विशेष लेखात नमूद केले आहे. Shri Rama’s Pranpratistha is the beginning of the restoration of India

अयोध्या म्हणजे ज्या शहरात युद्ध नसेल, संघर्षांपासून ते मुक्त असेल. भारतवर्षाच्या पुनर्उभारणीच्या मोहिमेची ही सुरुवात आहे. स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराचा एकमताने जीर्णोद्धार करण्यात आला. त्याच वेळी इतर मंदिरांबाबत चर्चा सुरू झाली. अशीच सहमती राम जन्मभूमीबाबत विचारात घेता आली असती. मात्र तुष्टीकरणाचे राजकारण आडवे आले. राजकारणाची दिशा बदलली, भेदभाव, तुष्टीकरणाचे राजकारण प्रचलित झाले. यातून हा प्रश्न प्रलंबित राहिला, अशी टीका सरसंघचालकांनी या लेखात केली.

या मुद्द्यावर विविध सरकारांनी हिंदू समाजाच्या भावनाही विचारात घेतल्या नाहीत. उलट हिंदू समाजाने याबाबत जे प्रयत्न चालवले होते, तेच हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. याबाबतची कायदेशीर लढाई स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. राम जन्मभूमीमुक्तीसाठी जनचळवळ ही 1980 मध्ये सुरू झाली ती 30 वर्षे चालल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले.

आपल्या भारताचा इतिहास हा परकीय आक्रमकांविरोधातील 1500 वर्षांच्या संघर्षांचा आहे. इस्लामच्या नावाखाली पश्चिमेकडून जे हल्ले झाले, त्यात भारतीय समाजाची धरोहर असणाऱ्या मंदिरांचा पूर्णपणे विध्वंस झाला तसेच समाजात दुरावलेपण आले. राष्ट्र आणि समाज यांचे खच्चीकरण करायचे असेल तर त्यांची धार्मिक स्थळे नष्ट करणे गरजेचे होते. त्यासाठी परकीय आक्रमकांनी भारतात मंदिरे नष्ट केली. हे केवळ एकदाच नव्हे, तर अनेकदा त्यांनी केले. भारतीय समाजातील नैतिक धैर्य कमी करून त्यांच्यावर राज्य करता येईल अशी त्यांची धारणा होती. अयोध्येत रामजन्मभूमीवरील मंदिराबाबतही हेच करण्यात आले, असे भागवत यांनी नमूद केले.

दीर्घ संघर्षानंतर रामजन्मभूमीवर श्री रामलल्लांचे भव्य मंदिर उभे राहत आहे. तिथे श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर भारताचे पुनःनिर्माण ही सुरू होत आहे, अशावेळी समाजातला शत्रूभाव नष्ट होऊन श्रीराम सर्वांचे या भावनेने आपण एकत्र आले पाहिजे. या ऐक्य भावनेतूनच भारताचे ऐक्य दृढमोल होईल आणि विश्व ऐक्यासाठी आपल्या प्रयत्नांना बळ मिळेल, असा विश्वास सरसंघचालकांनी लेखात व्यक्त केला आहे.

Shri Rama’s Pranpratistha is the beginning of the restoration of India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात