पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या दिवशी पंतप्रधान पदावर राहण्याचा इंदिरा गांधींचा विक्रम मोडला, नेमका त्याच दिवशी त्यांचे नातू राहुल गांधींनी OBC भागिदारी महासंमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. Rahul Gandhi
राहुल गांधी म्हणाले :
मी मोदींना दोन-तीन वेळा भेटलो. माझ्या असे लक्षात आले की त्या माणसामध्ये काही दम नाही. उगाच मीडियाने त्यांचा फुगा फुगवून ठेवलाय. नरेंद्र मोदी ही काही फार मोठी समस्या नाही. त्यांच्यात दम नाही. मी त्यांना भेटलो त्यावेळी त्यांच्या समावेत दोन-तीन वेळा एका खोलीत बसलो त्यांच्याशी बोललो म्हणूनच मी तुम्हाला त्यांच्या दम नसल्याचे सांगू शकतो तुम्ही कोणीही त्यांना भेटला नाहीत, पण मी भेटलोय म्हणूनच हे बोलतोय!!
राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर खुद्द त्यांच्या कपॅसिटी विषयी आणि नरेंद्र मोदींच्या कपॅसिटी विषयी विविध शंका आणि कुशंका तयार झाल्या. राहुल गांधी म्हणाले त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यात खरंच दम नाही, तर ते गुजरात मध्ये सलग तीन टर्म आणि पंतप्रधान पदावर सलग तीन टर्म कसे काय निवडून आले आणि ते निवडून आले असतील तर काँग्रेसने त्यांना कसे निवडून येऊ दिले??, हे दोन सवाल राहुल गांधींना त्यावेळी कुणी विचारले नाहीत त्यामुळे राहुल गांधींनी त्या सवालांची उत्तरे दिली नाहीत पण म्हणून हे सवाल गैरलागू ठरत नाहीत.
मोदींमध्ये दम नसेल तर…
राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार नरेंद्र मोदी या व्यक्तीमध्ये दम नसेल, तर त्यांच्यासारख्या दम नसलेल्या माणसाच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपने काँग्रेस सारख्या बलाढ्य पक्षाचा सलग तीन निवडणुकांमध्ये पराभव कसा काय केला?? भाजप सारख्या काँग्रेसच्या तुलनेमध्ये कायमच दुय्यम राहिलेल्या पक्षाला नरेंद्र मोदी सलग दोन वेळा लोकसभेत बहुमत कसे काय मिळवून देऊ शकले??, नरेंद्र मोदी भाजपला बहुमत मिळवून देत असताना राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली असलेली किंवा नसलेली काँग्रेस आणि तिचे नेते काय करत होते??, काँग्रेसने आणि त्याच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींचा भाजपला पूर्ण बहुमत मिळवून देण्याचा डाव आणून का पाडला नाही हे सवाल देखील त्यावेळी राहुल गांधींना कोणी विचारले नाही त्यामुळे या सवालांची उत्तरे देखील त्यांनी दिली नाहीत पण म्हणून हे सवाल देखील बेमानी ठरत नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच म्हणजे 25 जुलै 2025 रोजी इंदिरा गांधींचा पंतप्रधान पदावर सर्वाधिक दिवस राहण्याचा विक्रम मोडला. पंडित नेहरूंच्या नंतर सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले ते दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय आयुष्यामध्ये त्यांनी भाजप नावाच्या पक्ष संघटनेत केलेले काम सोडले, तर घटनात्मक पातळीवरच्या फक्त दोन पदांवर काम केले. ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आता देशाचे पंतप्रधान आहेत. त्या पलीकडे कुठल्याच कनिष्ठ स्तरावरच्या पदावर मोदींनी काम केले नाही. स्वतःच्या घराण्याची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मोदींनी केवळ संघ आणि भाजप या संघटनेच्या बळावर हे घडवून आणले.
राहुल गांधींचा परफॉर्मन्स
या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या राजकीय कॅपॅसिटी विषयी थोडे तपासले तर 2014 ची लोकसभा निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस हरली. काँग्रेसला फक्त 44 खासदार निवडून आणले. 2019 ची निवडणूक देखील काँग्रेस त्यांच्याच नेतृत्वाखाली हरली त्यावेळी तर ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसला 99 खासदार निवडून आणता आले हे खरे पण त्यासाठी फक्त त्यांचेच नेतृत्व उपयोगी ठरले असे मानणे अर्धसत्य ठरेल.
त्यामुळे राहुल गांधींच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काही दम नसेल आणि फक्त मीडिया आणि फुगवलेला तो फुगा असेल, राहुल गांधींमध्ये नेमका किती दम आहे आणि तो मीडियाने न फुगवलेला फुगा आहे की मोदींच्या कर्तृत्वामुळे फुटलेला फुगा आहे, हे तपासायचा अधिकार भारतीय जनतेला आहे. शिवाय नरेंद्र मोदी नावाचा फुगा काँग्रेसवाल्यांच्याच नाकावर फुटलाय, हे विसरून कसे चालेल??
मोदी कधी रिटायर होणार??
त्या पलीकडे जाऊन हा खरं म्हणजे काँग्रेसने मोदींना हलविण्याची इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासच गमावले असे समोर आले. कारण राहुल गांधी ज्या OBC भागिदारी महासंमेलनात मोदींच्या कपॅसिटी विषयी बोलले, त्याच संमेलनात 84 वर्षांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 74 वर्षांच्या नरेंद्र मोदींच्या रिटायरमेंट विषयी बोलले. मोदींनी लालकृष्ण अडवाणींना रिटायर केले मुरली मनोहर जोशींना रिटायर केले आता ते स्वतः 75 वर्षांचे होतील मग ते रिटायर होणार का असा सवाल 84 वर्षांच्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. आता खुद्द काँग्रेस अध्यक्ष तोंडी नरेंद्र मोदींच्या रिटायरमेंटचा मुद्दा आल्याने काँग्रेसने मोदींना हरविण्याची इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास गमावलाय का??, असा सवाल तयार झाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App