राहुल गांधी हजर होताना सुरत कोर्टासमोर 3 मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन; दिल्लीतून भाजपचे शरसंधान

वृत्तसंस्था

सुरत : देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्याबद्दल सुरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यांची खासदारकी कायदेशीर तरतुदीनुसार रद्द झाली. या खटल्यात फेर सुनावणीसाठी राहुल गांधी सुरत सत्र न्यायालयात हजर होताना काँग्रेसने कोर्टासमोर मोठी शक्तिप्रदर्शन चालविले आहे. Show of power of Congress with 3 Chief Ministers in front of Surat Court when Rahul Gandhi appeared

काँग्रेसचे तीन मुख्यमंत्री आपापले राज्य सोडून सुरत मध्ये हजर असल्याच्या बातम्या आहेत. या शक्तिप्रदर्शनाच्या मुद्द्यावरून दिल्लीतून भाजप नेत्यांनी काँग्रेसवर शरसंधान साधले आहे. सुरत मध्ये आज मोठा “पॉलिटिकल ड्रामा” होतो आहे. स्वतः राहुल गांधी सुरत सत्र न्यायालयात हजर असल्याने त्यांच्याभोवती काँग्रेस जणांची गर्दी झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील सुरत मध्ये पोहोचले आहेत. जेवणाच्या सुट्टीनंतर राहुल गांधींच्या केस संदर्भात सत्र न्यायालय शेर सुनावणी घेईल पण तोपर्यंत काँग्रेस मात्र कोर्टासमोर शक्तिप्रदर्शन करून घेत आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्यासह हजारो कार्यकर्ते सुरत कोर्टासमोर शक्तिप्रदर्शन करत आहेत. गुजरात पोलिसांनीही प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे कोर्ट परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

 भाजप – काँग्रेस शब्द युद्ध

सत्र न्यायालयातल्या सुनावणीपूर्वीच कोर्टावर दबाव आणण्यासाठी काँग्रेस गांधी परिवाराच्या बाजूने शक्तिप्रदर्शन करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. आत्तापर्यंत कोर्ट केसेस मध्ये माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, माजी गृहमंत्री ही चिदंबरम यांच्यासारखे अनेक महत्त्वाचे काँग्रेस नेते तुरुंगात गेले. त्यावेळी कोणत्याही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अथवा नेत्याने त्यांच्या पाठिंब्यासाठी शक्तिप्रदर्शन केले नव्हते. मग गांधी परिवार असा काय स्पेशल आहे तिच्या पाठीशी सगळे काँग्रेस नेते उभे राहिले आहेत??, असा बोचरा सवाल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे.

राहुल गांधी आमचे मोठे नेते आहेत. आम्ही गांधी परिवाराच्या पाठीशी उभे राहिलो तर भाजपच्या पोटात का दुखते??, असा प्रतिसवाल हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी केला आहे. राहुल गांधींच्या सुरत कोर्टातील हजेरी बाबत सुरत आणि दिल्लीत असे राजकारण रंगले आहे.

 

Show of power of Congress with 3 Chief Ministers in front of Surat Court when Rahul Gandhi appeared

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात