लोकांनी आरडाओरडा केला धावा, पहा व्हिडिओ
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : म्युनिकमधील इस्रायली ( Israeli ) दूतावासाबाहेर एका शूटरने गोळीबार केला. यादरम्यान एकच गोंधळ उडाला. याचा एक व्हिडिओही जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पळताना दाखवली आहे, तर अनेक गोळ्यांचे आवाज ऐकू येतात. या घटनेनंतर अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिका-यांनी एका संशयितावर गोळ्या झाडल्या, तो जखमी झाला आणि सध्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. म्युनिक पोलिसांनी ट्विटरवर लिहिले की, सध्या ब्रिएनरस्ट्रास आणि कॅरोलिनप्लॅट्झ परिसरात मोठी कारवाई सुरू आहे. आमच्याकडे अनेक आपत्कालीन कर्मचारी आहेत. आम्ही तुम्हाला विनंती करतो की हे क्षेत्र शक्य तितके टाळावे. या कारवाईसाठी हेलिकॉप्टरमधूनही देखरेख केली जात आहे.
म्युनिक येथील इस्रायली वाणिज्य दूतावासाजवळ गोळीबाराची घटना घडल्याची माहिती इस्रायली माध्यमांनी दिली. बव्हेरियाची राजधानी म्युनिक येथील इस्रायली वाणिज्य दूतावासाजवळ वारंवार गोळीबाराचा मोठा आवाज आल्यानंतर मोठ्या संख्येने पोलीस दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App