विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकार मध्ये सर्व काही आलबेल चालले असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दोन्ही नेते जरी करत असले तरी प्रत्यक्षात शिवसेनेत मात्र राष्ट्रवादी विरोधात प्रचंड संताप आहे. याचाच प्रत्यय काल शिवसेना खासदारांच्या बैठकीत आला. Shivsena – NCP Feud: Following Shiv Sena MLAs, Shiv Sena MPs also attacked NCP; Rent removed from Sanjay Raut’s dinner diplomacy !!
शिवसेनेचे प्रवक्ते आणि मावळते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना खासदारांसाठी काल बैठक आणि भोजन समारंभ आयोजित केला होता. या बैठकीत शिवसेनेच्या सर्व खासदारांचा संताप राष्ट्रवादीवर उफाळून आला. राष्ट्रवादी महाराष्ट्र जागोजागी शिवसेनेची अडवणूक करते आहे. शिवसेना वेळीच सावरली नाही आणि शिवसेनेचे नेतृत्व वेळीच जागे झाले नाही तर पुढची निवडणूक लढवणे देखील कठीण जाईल, असा गंभीर इशारा खासदारांनी या बैठकीत दिला. राष्ट्रवादी विरोधात शिवसेना खासदारांचा संताप पाहता संजय राऊत यांना देखील पत्रकार परिषदेत नंतर महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांच्या मंत्र्यांना शिवसैनिकांची कामे करा, अशा कानपिचक्या देण्याची वेळ आली.
संजय राऊत यांच्या घरी झालेल्या बैठकीत शिवसेनेचे सर्व खासदार एकीकडे आणि संजय राऊत दुसरीकडे असे चित्र निर्माण झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शिवसेनेचे सर्व खासदार प्रामुख्याने राष्ट्रवादी विरोधात बोलताना आढळले तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटत नाहीत अशा तक्रारी त्यांनी केल्या. पण प्रमुख तक्रारी या राष्ट्रवादी विरोधातच होत्या.
आधीच शिवसेनेचे 25 ते 30 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. शिवसेना आमदारांना निधी देण्यात दुजाभाव केल्या जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. आता या आमदारां पाठोपाठ शिवसेनेचे खासदारही राष्ट्रवादीवर भडकून असल्याचे संजय राऊत यांच्या डिनर डिप्लोमसीतून स्पष्ट झाले आहे. मात्र एवढे होऊ नये आणि शिवसेनेत असंतोषाचा ज्वालामुखी खदखदत असूनही मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
खासदारांच्या नाराजीची कारणे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या बैठकीत खासदारांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. शिवसेना मंत्री कार्यकर्त्यांची कामे करत नाहीत, शिवसेना कमकुवत होत चालल्याचंही खासदारांनी बोलून दाखवलं. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटत नसल्यानंही खासदार नाराज आहेत.
पक्षाला वेळीच बळकटी दिली नाही तर निवडणुका लढवणं कठिण होईल असा इशाराही या बैठकीत शिवसेना खासदारांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्रास देतात. असून शिवसेना आमदारांना निधी देत नाहीत, हा मुद्दाही याबैठकीत खासदारांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे पालकमंत्री शिवसेना आमदारांना योग्य वागणूक देत नाहीत असा सूरही या बैठकीत खासदारांनी लावला. यानंतर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट घडवून आणू असे आश्वासन खासदारांना दिले.
शिवसेना खासदारांची काल नवी दिल्लीत बैठकी झाली. काल संध्याकाळी सुरु झालेली बैठकी रात्री 11.00 वाजेपर्यंत सुरू होती. मराठावाडा आणि विदर्भात राबवण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानातून नेमकी काय परिस्थिती आहे हे खासदारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न या बैठकीत केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App