प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून काँग्रेसला कमजोर करत आहेत. काँग्रेसचे 12 मंत्री देखील काँग्रेसचे मूळ अजेंड्यावर काम करत नाहीत असा लेटर बाँम्ब काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने फोडला आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य विश्वबंधू राय यांनी थेट सोनिया काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्रातल्या काँग्रेसची कमजोरी आणि शिवसेना राष्ट्रवादीची कुरघोडी याविषयी तक्रारी केल्या आहेत. Shiv Sena – NCP is weakening Congress in Maharashtra
CONGRESS : नाना पटोलेंच्या नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये नाराजी ; दहा वर्षांपासून प्रवक्ते असणारे सचिन सावंत यांचा राजीनामा
महाराष्ट्रात लवकरच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आपापल्या पक्षाची मजबूत तयारी करताना दिसत आहेत. काँग्रेस पक्ष पोखरून आणि फोडून आपल्या पक्षांमध्ये नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भरती करत आहेत. परंतु, काँग्रेसचे डिजिटल भरती महाअभियान फसले. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे शिवसेनेबरोबर जुळवून घेत काम करत आहेत, असा आरोपही विश्वबंधू राय यांनी पत्रात केला आहे.
काँग्रेसचे मंत्री आपले वादे पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहेत. वीज बिल माफ करायचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण केलेले नाही. मुंबईत झोपडपट्टीधारकांना 500 स्क्वेअर फुटांची घरे देण्याचे मान्य केले होते. त्यादृष्टीने कोणतेही काम झालेले नाही. अशा मंत्र्यांशी संबंधीत तक्रारीदेखील विश्वबन्धु राय यांनी पत्रात केल्या आहेत.
काँग्रेसने महापालिका निवडणुका स्वतंत्र लढवल्या पाहिजेत. तशा घोषणाही करण्यात आल्या. परंतु त्या दृष्टीने कोणतीही तयारी मुंबईसह प्रदेश पातळीवर दिसत नाही, असा आरोपही विश्वबंधू राय यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये अशा पत्रांना प्रश्न उत्तरे देण्याची प्रथा नाही. परंतु विश्वबंधू राय यांच्या पत्रामुळे काँग्रेसमधली अंतर्गत बेदिली समोर आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App