वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर १ मार्चला सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालय करणार की ती उच्च न्यायालयात होणार, हे त्यानंतरच स्पष्ट होईल.Shiv Sena MLA disqualification case; Hearing on the Thackeray group’s petition will be held on March 1
शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रतेबाबत 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची ही याचिका सोमवारी न्यायालयासमोर आली होती. त्या वेळी या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयातच व्हावी, असा आग्रह ठाकरे गटाच्या वकिलांनी धरला होता, तर याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आधीच याचिका दाखल असल्याने तिथेच सुनावणी व्हावी, अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केली होती.
अध्यक्षांच्या आणखी एका निर्णयावरही उद्धव गटाने प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षात बंडखोरी करणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिका फेटाळण्याच्या सभापतींच्या निर्णयालाही उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये शिवसेनेच्या 16 आमदारांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केले. शिंदे मुख्यमंत्री झाले तर भाजप नेते आणि पूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App