sherlyn chopra : सोनिया नुसतं म्हणाल्या, आप लडकी ढूंढो ना; इधर शर्लिन खुद तैयार!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सोनिया म्हणाल्या, आप लडकी ढूंढो ना; त्यानंतर काही दिवसात लडकी खुद तैयार असे घडले आहे. सोनिया गांधींना हरियाणातल्या काही शेतकरी महिला भेटल्या, त्यावेळी त्यापैकी एका महिलेने सोनिया गांधींना राहुल गांधींचे आता लग्न करून टाका, अशी सूचना केली. त्यावेळेस सोनिया गांधींनी हजरजबाबी दाखवत आप लडकी ढुंढो ना, असे उत्तर दिले. पण आता लडकी खुद तैयार बैठी है… राहुल – सोनियांच्या होकाराची वाट पाहत आहे. ही लडकी पण साधीसुधी नाही, तर बॉलीवूडची अभिनेत्री शर्लिन चोप्रा आहे. sherlyn chopra is ready to marry Rahul Gandhi

शर्लिन चोप्राचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. त्यात तिने राहुल गांधींशी लग्न करण्याची तयारी दाखवली आहे. फक्त तिने त्यासाठी एकच अट घातली आहे, ती म्हणजे लग्नानंतर तिला स्वतःचे चोप्रा हेच आडनाव कायम लावायचे आहे. या परती दुसरी कोणतीही तिची अट नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त हिट झाला आहे आणि अनेक जण त्याच्यावर कमेंट करत आहेत. काहींनी शर्लिन चोप्राला ट्रोल केले आहे, तर काहींनी राहुल गांधींना मुलगी तर तयार आहे, आता तुमचे बोला, असे म्हणून लग्न करण्याचे आवाहन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

राहुल गांधी हरियाणाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी काही शेतकरी महिलांच्या भेटीसाठी घेतल्या होत्या. त्यांच्याबरोबर भात लावणी केली होती आणि त्या शेतकरी महिलांना राहुल गांधीना दिल्लीला निमंत्रित केले होते. राहुल गांधींच्या निमंत्रणानुसार या शेतकरी महिला दिल्लीत आल्या. त्यांनी दिल्ली पाहिली. राहुल, प्रियांका आणि सोनिया गांधी यांनी त्यांना राहुल गांधींच्या घरी भोजनासाठी बोलवले.

या महिलांनी गांधी परिवारासाठी खास हरियाणवी लस्सी आणली होती. गांधींच्या घरी या महिलांनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यावेळी एका महिलेने सोनिया गांधींच्या शेजारी बसत आता राहुल गांधींचे लग्न करून टाका, अशी सूचना केली. त्याबरोबर सोनिया गांधींनी त्या महिलेला आप लडकी ढूंढो ना!!, असे उत्तर दिले. त्यामुळे तिथे जोरदार हशा पिकला. पण आता तर शर्लिन चोप्रा स्वतःहून राहुल गांधींशी लग्न तयार झाली आहे. त्यामुळे राहुल गांधींचा जबाब काय असेल??, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

sherlyn chopra is ready to marry Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात