विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बारामती लोकसभा मतदारसंघातले मतदान पार पडतात तिथल्या पराभवाच्या शंकेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची पुडी सोडली. नंतर त्यांनी आपण कसे बोललोच नसल्याचा खुलासा करत कानावर हात ठेवले पण पवारांच्या विलीनीकरणाची पुडी संपूर्ण देशभर तिरंगली. त्यावर आता शशी थरूर यांनी रेड कार्पेट अंथरण्याची तयारी दाखवली. Shashi Tharoor showed his readiness to walk the red carpet
4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अनेक प्रादेशिक पक्षांना काँग्रेसच्या जवळ जावे लागेल काही पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावे लागेल असे राजकीय भाकीत शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत वरती दिले होते. बारामती लोकसभा मतदारसंघातले मतदान पार पडण्याआधी पवारांनी ही मुलाखत दिली होती परंतु बारामतीतले मतदान पार पडल्यानंतर पवारांच्या टायमिंग नुसार ही मुलाखत पिंड एक्सप्रेस मध्ये प्रसिद्ध झाली त्यामुळे पवारांना अपेक्षित असलेल्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटल्या.
भटकती आत्मा अशा शब्दांनी पवारांना ठोकणाऱ्या पंतप्रधान मोदींनी पवारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर येण्याचा सल्ला दिला. काँग्रेस मधून सुरुवातीला सावध प्रतिक्रिया उमटली परंतु शशी थरूर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अनुभव घेतलेल्या परंतु राष्ट्रीय आणि राजकारणाच्या अनुभवाचा अभाव असलेल्या नेत्याने पवारांना रेड कार्पेट अंथरून स्वागत करण्याची ऑफर दिली.
वेगवेगळ्या कारणांसाठी काँग्रेस मधून बाहेर पडलेले नेते जर कुठल्याही कारणासाठी काँग्रेसमध्ये परत येत असतील आणि ते आपले पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करत असतील, तर काँग्रेस या सगळ्यांचे रेड कार्पेट अंथरून स्वागत करेल, असे शशी थरूर म्हणाले.
परंतु ते “शरद पवार” आहेत. शरद पवारांनी कुठली गोष्ट बोलली किंवा सांगितली, तर त्याचा नेमका उलटा अर्थ घ्यायचा असतो, हे शशी थरूर यांना माहिती नाही. त्यामुळे पवारांनी मूळातच विलीनीकरणाची पुडी सोडली. नंतर त्यांनी आपण तसे बोललोच नसल्याचा खुलासा करत कानावर हात ठेवले, तरी देखील शशी थरूर यांनी पवारांचे रेड कार्पेट अंथरुन स्वागत करायचे वक्तव्य केले त्यातून त्यांची नेहमीची उताविळी दिसली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App