विशेष प्रतिनिधी
जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबरदस्त हुशार व्यक्ती आहेत. त्यांनी काही अशी कामं केली आहेत, जी राजकीयदृष्ट्या खूप प्रभावशाली ठरली आहेत. भाजपा उत्तर प्रदेशमध्ये इतक्या मोठ्या फरकाने जिंकेल, असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण ते जिंकले. या विजयाचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदींना जाते,Shashi Tharoor praises PM for victory, but accuses BJP of splitting in the name of religion
असे कौतुक कॉँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केले आहे. मात्र, भाजप धर्माच्या नावावर फूट पाडत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमधील संभाषणात शशी थरूर म्हणाले की, भाजपा जाती आणि पंथाच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करते.
त्यांच्या दृष्टीने जय श्री राम म्हणणारा एकमेव व्यक्ती हिंदू आहे. भारतीय मतदारांनी पक्षांना नेहमीच आश्चयार्चा धक्का दिला आहे, एकेदिवशी भाजपालाही याची जाणीव होईल.उत्तर प्रदेश निवडणुकीबद्दल बोलताना शशी थरूर म्हणाले की, भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले, पण लोकांनी समाजवादी पक्षाला मतदान केले.
कारण सपालाही चांगल्या जागा मिळाल्या. त्यामुळे विरोधकांना बळ मिळेल. त्याच वेळी, गोवा आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेस पक्ष अधिक चांगली कामगिरी करू शकला असता आणि काँग्रेस पक्षात सर्वात मोठा पक्ष बनण्याची क्षमता असल्याचे शशी थरूर म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App