वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये 17 ऑक्टोबरला अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपूरचे खासदार शशी थरूर अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. त्यांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र लवकरच ते याबाबत निर्णय घेऊ शकतात.Shashi Tharoor is thinking of contesting the Congress President election, will take a decision soon
काँग्रेसमधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर थरूर यांनी एक लेखही लिहिला आहे. यामध्ये त्यांनी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांबाबत चर्चा केली.
वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. मात्र, अंतिम निर्णय होणे बाकी आहे. थरूर यांना याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. शशी थरूर यांनी मल्याळम दैनिक ‘मातृभूमी’साठी एक लेख लिहिला. त्यात त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक मुक्त आणि निष्पक्ष व्हावी, असे म्हटले आहे.
CWC सदस्य पदासाठीही निवडणूक घेण्यात यावी
या लेखात थरूर यांनी लिहिले आहे की, त्यांनी म्हटले आहे की, पक्षाने CWC सदस्यपदासाठीही निवडणूक जाहीर करायला हवी होती. पक्षातील या प्रमुख पदांचे नेतृत्व कोण करणार हे निवडण्याची मुभा एआयसीसी आणि पीसीसी सदस्यांना द्यावी, असे थरूर म्हणाले. थरूर हे काँग्रेसच्या G-23 नेत्यांपैकी एक आहेत, जे सातत्याने पक्षात संघटनात्मक बदलाची मागणी करत आहेत.
शशी थरूर म्हणाले, ‘नव्या अध्यक्षाची निवड ही काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची सुरुवात आहे. त्याचीही नितांत गरज आहे. निवडणुकीचे इतर फायदेशीर परिणामही आहेत, असे ते म्हणाले. विशेषतः, ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्याच्या निवडीबद्दल आम्ही जगभरातील स्वारस्य पाहिले. 2019 मध्ये आम्ही तेच पाहिले, जेव्हा थेरेसा मे यांच्या जागी डझनभर उमेदवार रिंगणात होते आणि बोरिस जॉन्सन पक्षाचे नेते बनले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App