द काश्मीर फाईल्सवर शशी थरुर अखेर बोलले, पंडितांवर झालेल्या अत्याचाराला मुस्लिम कसे जबाबदार म्हणाले

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाइल्स चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत आहे. या चित्रपटावर अखेर कॉँग्रेसचे अध्यक्ष शशी थरूर बोलले आहेत. मुस्लिमांना गुन्हेगार ठरवून काश्मीरी पंडितांना न्याय मिळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.Shashi Tharoor finally spoke on The Kashmir Files, how Muslims blamed the atrocities on Pandits

थरुर म्हणाले, काश्मिरी पंडितांना भयंकर त्रास सहन करावा लागला. त्यांच्या हक्कांसाठी आपण उभे राहिले पाहिजे. पण, त्यासाठी काश्मिरी मुस्लिमांना गुन्हेगार ठरवण्याने काश्मिरी पंडितांना कोणताही फायदा होणार नाही. द्वेष केवळ लोकांना विभाजित करतो आणि मारतो.



काश्मिरी पडितांना न्याय हवा आहे, जो मुस्लिमांना गुन्हेगार ठरवून मिळणार नाही. त्यामुळे सर्वांचंच ऐकून घेतलं पाहिजे, सर्वांनाच मदत झाली पाहिजे.शशी थरूर यांनी हे ट्वीट करताना एका फेसबूक पोस्टचा संदर्भ दिलाय.

त्या पोस्टमध्ये म्हटलंय की, काश्मिरी पंडितांचे दु:ख खरे होते आणि आहे. एखाद्या प्रपोगंडा करणाºयाने या विषयावर चित्रपट बनवला म्हणून किंवा उजव्या विचारसरणीने जमेल तेव्हा ते हायजॅक करण्याचा प्रयत्न केला, याचा अर्थ काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरातून हाकलून दिले नाही, असा होत नाही.

संख्येने काही फरक पडत नाही. एखाद्या अल्पसंख्याक समुदायातील ३ सदस्य मारले गेले असतील तरीही, कोणत्याही निष्पाप जीवाला द्वेषामुळे जीव गमवावा लागू नये. काश्मिरी पंडितांची नवी पिढी त्यांच्या व्यथा आणि त्यांच्या कथा मांडत आहे.

त्यांच्या व्यथा ऐकल्या जाव्यात, पण त्याच प्रमाणे काश्मिरी मुस्लिमांच्या व्यथाही ऐकल्या जाव्या. ज्यांना त्रास सहन करावा लागला, त्यांच्या वेदनाही तुम्ही मान्य करत नसाल तर तुम्ही कोणतेही मतभेद सोडवू शकत नाहीे.

Shashi Tharoor finally spoke on The Kashmir Files, how Muslims blamed the atrocities on Pandits

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात