शरद पवार कारण नसताना मेट्रोतून फिरून आले, त्यांचा आणि मेट्रोचा काहीही संबंध नाही, गिरीश महाजन यांचा पलटवार


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शरद पवार हे गतवेळी त्यांचा काही संबंध कारण नसताना मेट्रोतून फिरून आले होते. मी किती चांगलं काम करतो हा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्या मेट्रोचा आणि त्यांचा काडीचा संबंध नाही. पण ते मेट्रोमधून का फिरले. हे सगळे राजकीय आरोप-प्रत्यारोप आहेत, असा पलटवार माजी मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.Sharad Pawar ride Metro without any reason, he has nothing to do with Metro, says Girish Mahajan

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौºयाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोचं काम पूर्ण झालं नाही तरी उद्घाटन होतय, असा आरोप पवार यांनी केला होता. यावर उत्तर देताना महाजन म्हणाले, शरद पवार यांच्या वक्तव्याला कुठेही काही अर्थ नाही. शरद पवार हे गतवेळी त्यांचा काही संबंध नसताना, काही कारण नसताना मेट्रोतून फिरून आले होते.



मी किती चांगलं काम करतो हा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्या मेट्रोचा आणि त्यांचा काडीचा संबंध नाही. पण ते मेट्रोमधून का फिरले. मला वाटतं हे सगळे राजकीय आरोप-प्रत्यारोप आहेत. त्यांचा प्रयत्न हाच आहे की, पंतप्रधान येत आहेत. पुणे भाजपमय, मोदीमय झालं. त्यामुळे त्यांना साहाजिकच वाईट वाटतंय. म्हणून त्यांना असं विधान करावं लागतेय.

मेट्रो प्रकल्पाच्या व अन्य विकासकामाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी उद्या पुण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनासाठी येत आहेत. पण ते अर्धवट कामाचे उद्घाटन करतील.

अजूनही मेट्रोचे काम पूर्ण झालेले नाही. याचा विचार पंतप्रधानांनी केला असावा’, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. प्रकल्पांची उद्घाटने करण्यापेक्षा युक्रेनमधील मुलांना सोडवून आणणे अधिक गरजेचे आहे.

Sharad Pawar ride Metro without any reason, he has nothing to do with Metro, says Girish Mahajan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात