विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या. तसेच अन्य राज्यांनी कर कमी केले आणि जनतेला स्वस्त दरात इंधन देण्याची घोषणा केली. या उलट महाराष्ट्रात इंधन स्वस्त करण्यासाठी कोणतीच पावले उचलली जात नसून राज्याला जीएसटीचा हिस्सा द्यावा, अशी मागणी करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विषयाला फाटे फोडले आहेत. त्यामुळं इंधन कपात मुद्याला त्यांनी बगल दिल्याचे उघड होत आहे.Sharad Pawar Ignoring the issue of fuel price cut in the state; rising Gst issue
अन्य राज्याप्रमाणे महाराष्ट्रात इंधनाचे दर कमी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे जनता त्रस्त आहे. त्याबाबत सरकारने आता पावले उचलण्याची गरज आहे. तसे न करता शरद पवार हे विषयाला फाटे फोडत आहेत. जीएसटीच्या राज्याच्या हिस्सा या मुद्यावरून इंधन कपात करण्याच्या विषयाला बगल दिली जात आहे.
आधी पुतण्याचा आता काकांचा विरोध
इंधन हे जीएसटीत आणण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी विरोध केला होता. आता त्यांचे काका शरद पवार हे इंधनावरील कर कपात करण्याबाबत स्पष्ट बोलत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जनतेला दिलासा देण्यास प्रथम पुतण्याने विरोध केला. आता काका विरोध करत आहेत.
सरकार जनतेचे असून लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक आहेत. ही संकल्पना राज्यात कालबाह्य झाली की काय ? असा प्रश्न जनतेला पडला आहे. राज्य सरकारमधील मंत्री १०० कोटीशिवाय बोलत नाहीत. दुसरीकडे जनता पाच आणि दहा रुपये कमी करण्याची मागणी करत आहे. ही साधी मागणी सरकार मान्य करण्यास तयार नसल्याचे एकंदरीत दिसते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App