नाशिक : सुनेत्रा पवार यांच्या निर्णयातून शरद पवार “नॉन प्लस” झाले. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करायचा निर्णय झाला तो त्यांनी स्वीकारला. मात्र, त्यावेळी शरद पवारांना किंवा सुप्रिया सुळे यांना विचारण्यातच आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तो निर्णय परस्पर घेतला. त्यांनी काल मुंबईत बसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा केली. त्याचवेळी बारामतीत अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सुनेत्रा पवारांचा होकार घेऊन ते मुंबईला रवाना झाले.
त्यानंतर रात्री उशिरा सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे बारामतीतल्या सहयोग सोसायटी या त्यांच्या निवासस्थानातून कारने पुणे आणि मुंबईला रवाना झाले. मात्र त्यापूर्वी यापैकी कुणीही शरद पवारांशी किंवा सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला नाही. त्यांच्याशी चर्चा केली नाही. ते आज सकाळी मुंबईत अजित पवारांचे शासकीय निवासस्थान देवगिरीवर दाखल सुद्धा झाले.
– पवारांची कबुलीची पत्रकार परिषद
त्याचवेळी शरद पवारांनी बारामतीत पत्रकार परिषद घेऊन आपल्याला कुठल्याही निर्णय या संदर्भात विचारण्यात आलेला नाही किंवा चर्चा करण्यात आली नाही, याचे स्पष्ट करून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल त्यावर आपण भाष्य करणार नाही. आज त्यांचा उपमुख्यमंत्री पदावर शपथविधी आहे आपल्याला माहितीच नाही. पण या निर्णयासंदर्भात आपल्याशी कोणीही चर्चा केली नाही, असा स्पष्ट खुलासा शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केला.
बाकी पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवारांना कर्तृत्ववान नेते म्हटले. त्यांचा कामाचा झपाटा पुढची पिढी पुढे नेईल असे म्हणाले. पण प्रामुख्याने त्यांच्या पत्रकार परिषदेतला मुद्दा आपल्याला निर्णय घेताना विचारले नाही, हा होता. त्यामुळे सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करायचा निर्णय प्रक्रियेतून शरद पवार नॉन प्लस झाले याची कबुली त्यांनी स्वतःच दिली.
– पवारांनी “डाव” टाकण्यापूर्वीच निर्णय
याचा दुसराही अर्थ असा, की शरद पवार किंवा सुप्रिया सुळे कोणताही कौटुंबिक किंवा भावनिक “डाव” टाकून सुनेत्रा पवारांचे उपमुख्यमंत्री पद अडकवून ठेवण्यापूर्वीच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हा निर्णय घेऊन मोकळे झाले. त्याचबरोबर नरेश अरोरा यांच्यामार्फत सुनेत्रा पवार यांच्या गळीदेखील तो निर्णय उतरविण्यात ते यशस्वी झाले, म्हणून तर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे बारामतीतून काल रात्रीच बाहेर पडून मुंबईला निघून आले. त्यामुळे शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांना त्यांच्यावर कुठलाही कौटुंबिक आणि भावनिक “डाव” टाकता आला नाही.
– महाराष्ट्रातल्या इतिहासात पहिल्यांदाच
आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असे कधी घडल्याचे उदाहरण सापडत नव्हते. महाराष्ट्रातल्या कुठल्याही महत्त्वाच्या निर्णयात शरद पवारांचा कुठे ना कुठेतरी हात किंवा पाया असायचा. अनेक निर्णयांमध्ये त्यांची लुडबुड असायची. अनेक विषयांमध्ये त्यांचा संबंध असो किंवा नसो ते अशी काही मते व्यक्त करून त्या विषयांना किंवा प्रकरणांना ट्विस्ट द्यायचे, की त्यामुळे त्यांना विचारावेच लागायचे. त्याशिवाय इतर नेत्यांना दुसरा पर्याय शिल्लक राहायचा नाही. पवारांच्या या डाव टाकल्यामुळे किंवा खेळी करण्यामुळे अजित पवारांना शपथ घेऊन 80 तासांत परत यावे लागले होते. पण त्यामुळे पवारांपेक्षा अजित पवारांची प्रतिमा डागाळली होती. त्या उलट मराठी माध्यमांनी शरद पवारांची प्रतिमा “चाणक्य” म्हणून उजळवली होती.
– सुप्रियांच्या नेतृत्वाची सोंगटी पुढे सरकवायचा डाव
आता सुद्धा अजित पवारांच्या अकाली exit नंतर शरद पवारांच्या गोटातून राष्ट्रवादीच्या ऐक्याचा मुद्दा मध्येच ऐरणीवर आणून सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाची सोंगटी पुढे सरकवायचा डाव पवार खेळत होते. प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ नेत्यांनी हा डाव वेळीच ओळखला म्हणून तर त्यांनी तातडीने आणि वेगाने हालचाली करून सुनेत्रा पवारांच्या गळी उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय ताबडतोब उतरविला. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे ऐक्य व्हायचे असेल, तर ते सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली होईल, अन्यथा लांबणीवर पडेल किंवा ते होणारही नाही. पण अजित पवारांच्या एक्झिट नंतर घडलेल्या या सगळ्या राजकारणातून शरद पवार मात्र “नॉन प्लस” झाले. तिकडे मुंबई महापालिकेत पराभव झाल्यानंतर ठाकरे “नॉन प्लस” झाले, तर महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार “नॉन प्लस” झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App