ED चौकशीला सामोरे जाताना रोहित पवारांना शरद पवारांनी यशवंतरावांचेे पुस्तक दिले भेट; पण यशवंतरावांनी “तसा” संघर्ष केलाच कधी??

बारामती ॲग्रो घोटाळा प्रकरण सक्तवसुली संचलनालय अर्थात ED चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी आमदार रोहित पवारांनी मोठा गाजावाजा आणि इव्हेंट केला. ते ED चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना भेटले. विधिमंडळात जाऊन त्यांनी महापुरुषांना वंदन केले. रोहित पवारांच्या समर्थकांनी “पळणारा नव्हे, लढणारा दादा!!” अशी पोस्टर्स झळकवली. शरद पवारांनी देखील “तू लढ” असे म्हणत यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तक रोहित पवारांना भेट दिले की, ज्यातून रोहित पवारांना संघर्ष करण्याची प्रेरणा मिळावी!! Sharad pawar gave y b chavan book to rohit pawar, but chavan didn’t face corruption charges like pawars!!

मराठी माध्यमांनी देखील पवारांनी रोहित पवारांना यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तक भेट दिल्याच्या बातम्या आवर्जून चालविल्या, पण रोहित पवार ज्या बारामती ॲग्रो घोटाळ्यात अडकले आहेत आणि त्यामुळे त्यांना ED चौकशीला सामोरे जावे लागत आहे, “तसा” संघर्ष यशवंतराव यांनी कधी केला किंवा त्यांना कधी करावा लागला होता??, हा सवाल तयार झाला आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय आयुष्यात त्यांच्यावर राजकीय आरोप – प्रत्यारोप खूप झाले, पण भ्रष्टाचाराचे आरोप मात्र फारसे कधी झाले नाहीत आणि त्यांना ED किंवा तत्सम चौकशीला कधी सामोरे देखील जावे लागले नाही. त्या अर्थाने यशवंतरावांचे राजकीय आयुष्य “बेदाग” होते.

पवार खानदानावर भ्रष्टाचाराचे आरोप

त्या उलट रोहित पवारांसकट अख्खे पवार खानदान भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये लिप्त आहे. शरद पवारांवर लवासापासून ते राज्य शिखर बँकेपर्यंत घोटाळे केल्याचे आरोप आहेत. त्यात अजित पवारांचे देखील नाव आहे. अजित पवारांबरोबरच पत्नी सुनेत्रा पवार आणि अजितदादांच्या तीन बहिणींची नावे अशाच घोटाळ्यांमध्ये सामील आहेत. इतकेच काय पण त्यांच्या घरांवर ED ने छापे देखील घातले आहेत.


अर्थ खातं जरी अजित पवारांकडे असलं, तरी निधी वाटप फडणवीसांच्या सूचनेनुसारच – रोहित पवार


आता अजित पवार तिसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री पद स्वीकारून सत्ताधारी गटात आले आहेत. पण म्हणून त्यांच्यावरचे आरोप अथवा खटले अजून पूर्णपणे काढले गेलेले नाहीत. पवार कुटुंबांच्या अन्य सदस्यांवरचे आरोपही तसेच कायम आहेत. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगतात, पण यशवंतरावांची “बेदाग” राजकीय कारकीर्द पवारांच्या वाट्याला त्यांच्या कर्तृत्वाने कधीच आली नाही. उलट राजकीय आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शरद पवारांवर वेगवेगळे आरोपच होत राहिले आणि त्यातही पैशाच्या घोटाळ्यांच्या आरोपांची संख्या अधिक आहे. पवारांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्यावर “असले” कधीच आरोप झाले नाहीत. त्यामुळे त्यांना “तसा” संघर्ष देखील करावा लागला नाही.

आज पवारांनी मोदी सरकार विरोधात भूमिका घेतल्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ED चौकशीला सामोरे जावे लागत असल्याचा आभास जरी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि त्यांचे समर्थक निर्माण करत असले प्रत्यक्षात त्या राजकीय संघर्षापेक्षा त्यांच्यावरच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपाचा याच्यात फार मोठा वाटा आहे. तसल्या आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांना अथवा चौकशीला यशवंतरावांना कधी सामोरे जावे लागले नाही. अर्थातच यशवंतरावांच्या तोंडी “तशी” संघर्षाची भाषा आली नाही.

पण त्याचबरोबर यशवंतरावांनी सत्तेशी संघर्ष केला आणि आपले स्वतंत्र अस्तित्व उभे केले, असेही त्यांच्या राजकीय कारकीर्दीत फारसे घडले नाही. 1978 ते 80 ही 2 वर्षे वगळता यशवंतराव गांधी – नेहरू परिवाराच्या छत्रछायेखाली आपली राजकीय कारकीर्द टिकवून राहिले आणि 1980 मध्ये आपला संघर्ष अपयशी ठरल्याचे बघून यशवंतरावांनी इंदिरा गांधींपुढे पूर्ण शरणागती पत्करली होती. त्यामुळे पवारांनी जरी “तू लढ” असे सांगत रोहित पवारांना यशवंतरावांचे पुस्तक दिले असले, तरी प्रत्यक्षात लढण्याची “तशी” प्रेरणा त्या पुस्तकात खरंच किती असेल??, याविषयी दाट शंका आहे.

कारण यशवंतरावांच्या राजकीय कारकीर्दीचा इतिहास त्यांचे समर्थक “समन्वयाचा” असल्याचे सांगत असतात, पण तो प्रत्यक्षात इंदिरा गांधींपुढे शरणागती पत्करण्याचा इतिहास आहे. मग यशवंतरावांचे पुस्तक रोहित पवारांच्या तथाकथित संघर्षात प्रेरणा देण्यासाठी कितपत उपयोगी ठरेल??, हा खरा सवालच आहे… की प्रत्यक्षात आपण “संघर्ष” करतोय, असा मुखवटा चेहऱ्यावर चढवून आतून सत्तेपुढे शरणागती पत्करण्याची “यशवंत गुटी” त्या पुस्तकातून शरद पवारांनी रोहित पवारांच्या हाती दिली आहे??, हा सवाल जास्त कळीचा आहे आणि त्याचे उत्तर पवारांसाठी अडचणीचे असणार आहे!!

Sharad pawar gave y b chavan book to rohit pawar, but chavan didn’t face corruption charges like pawars!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात