विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने भारत जोडला की नाही हा भाग अलहिदा, पण त्यांच्या चालण्याने मोदी विरोधातले सगळे पक्ष केंद्रातले काँग्रेसचे वर्चस्व मानायच्या दिशेने निघाले आहे, हे मात्र नजरेआड न करता येणारी वस्तूस्थिती बनत आहे. Sharad Pawar, Farooq Abdullah and Mehbooba Mufti to fall in lines with the Congress for their future politics
शरद पवारांचे तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेस भवन मध्ये जाणे, डॉ. फारूक अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांचे भारत जोडो यात्रेत सामील व्हायला मान्यता देणे आणि राहुलजींच्या भारत जोडो यात्रेमुळे युवकांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आकर्षण निर्माण झाले आहे, असे वक्तव्य एम. के. स्टालिन यांनी करणे यातूनच प्रादेशिक विरोधी पक्ष काँग्रेसच्या वर्चस्व मानण्याच्या दिशेने निघाल्याचे दिसत आहेत.
ममता बॅनर्जी आणि केसीआर चंद्रशेखर राव यांनी विरोधी ऐक्याचे प्रयत्न करताना काँग्रेसला दुय्यम स्थान दिले होते. किंबहुना काँग्रेस वगळून सर्व विरोधी पक्षांच्या ऐक्याचा त्यांचा मनसूबा होता. पण आता मात्र राहुलजींच्या भारत जोडो यात्रेने हे चित्र बदलल्याचे दिसत आहे.
शरद पवारांना काँग्रेसने 1999 साली पक्षातून काढून टाकल्यानंतर ते 2022 मध्ये पुण्याच्या काँग्रेस भवन मध्ये गेले. तेथे त्यांनी काँग्रेसला वगळून देशाचे राजकारण करता येणार नाही काँग्रेस विचारधाराच मुख्य आहे काही धोरणात्मक मतभेद असले तरी काँग्रेसमुक्त देश करणे शक्य नाही, असे स्पष्ट प्रतिपादन करून आपल्या पुढच्या राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली.
24 वर्षानंतर पवारांचे काँग्रेस भवन मध्ये येणे हे पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण 5 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेत राजकीय वर्चस्व स्थापन केले होते. दरम्यानच्या काळात भाजपची सत्ता आल्याने पुणे महापालिका राष्ट्रवादीच्या हातून निसटली होती. ही महापालिका पुन्हा काबीज करायची असेल तर काँग्रेस सारख्या जुन्या पक्षाच्या राजकीय बळाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, याची जाणीव पवारांना झाल्यामुळेच पवार पुन्हा काँग्रेस भवन मध्ये गेल्याचे मराठी माध्यमांच्या बातम्यांमध्ये म्हटले आहे.
म्हणजे मराठी माध्यमांनी पवारांच्या काँग्रेस भवन मध्ये जाण्याला फक्त स्थानिक राजकारणाचा संदर्भ दिला आहे. पण पवारांच्या एकूण राजकारणाचा अनुभव लक्षात घेता त्याला स्थानिक बरोबरच प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरचा देखील संदर्भ आहे, हे दिसून येते. स्वतः पवार भारत जोडो यात्रेत सामील झाले नसले तरी त्यांनी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांना राहुलजींबरोबर चालायला भारत जोडो यात्रेत पाठवले होते, ही बाब नजरेआड करता येणार नाही आणि त्यानंतर पवार पुण्याच्या काँग्रेस भवनात गेले. यातून त्यांनी राष्ट्रवादीच्या भविष्यातल्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे.
Ive been formally invited to join @RahulGandhi ji for his Bharat Jodo Yatra in Kashmir today. Salute his indomitable courage & I believe it is my duty to stand with someone who has the courage to challenge fascist forces. Will be joining him in his march towards a better India. — Mehbooba Mufti (@MehboobaMufti) December 27, 2022
Ive been formally invited to join @RahulGandhi ji for his Bharat Jodo Yatra in Kashmir today. Salute his indomitable courage & I believe it is my duty to stand with someone who has the courage to challenge fascist forces. Will be joining him in his march towards a better India.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) December 27, 2022
जे पवारांच्या बाबतीत तेच महबूबा मुफ्तींच्या बाबतीत. मेहबूबा मुफ्ती यांनी भारत जोडो यात्रेत सामील होण्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसने डॉ. फारूक अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना भारत जोडो यात्रेचे निमंत्रण दिले. ते त्यांनी कबूल केले आहे. जम्मू काश्मीर मधून 370 कलम म्हटल्यानंतर अब्दुल्ला आणि मुफ्ती हे राजकीय दृष्ट्या विस्थापित झाले होते. तेथे पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी आता त्यांना काँग्रेसच्या आधाराची गरज आहे.
जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद पक्ष सोडून गेल्यानंतर काँग्रेसला देखील जम्मू काश्मीरमध्ये अब्दुल्ला मुफ्ती राजकीय जोडीच्या आधाराची गरज आहे. त्यामुळे हे दोन्ही घटक एकमेकांना पूरक भूमिका घेऊन पुढची वाटचाल करणार आहेत. पण त्यातही केंद्रातले काँग्रेसचे वर्चस्व मान्य केले अब्दुल्ला आणि मुक्ती यांनाही पर्याय नसल्याचे स्पष्ट होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App