विशेष प्रतिनिधी
मुंबई : दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीनसारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटरमध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती, असा हल्लाबोल भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी शरद पवारांवर केला आहे.
देशाचे गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. पण यापैकी कोणालाही आपल्या राज्यातून तडीपार केले गेले नव्हते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मंगळवारी हल्ला चढवला. यावर भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी एक्सद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे.
तावडे म्हणाले आहेत की, दाऊद इब्राहिमच्या हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा पवार विसरले आहेत.
“दोन जन्मठेपांची – काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का? श्रद्धेय अटलजी, अडवाणीजी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात १७ महिने तुरुंगात होते, ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयी देखील हेच म्हटले असते का? हे पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे, असेही तावडे म्हणाले.
शरद पवार आणि दाऊद यांच्या संबंधांबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 35 वर्षांपासून चर्चा आहे. मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी दुबई विमानतळावर दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती.तसेच या भेटीदरम्यान दाऊदने शरद पवार यांना सोन्याचा हार दिला, असा असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.
शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी 1989 ते 1991 या कालावधीत मुंबई ते इंग्लंड आणि तिथून कॅलिफोर्निया, तसेच कॅलिफोर्नियातून पुन्हा इंग्लंडला येऊन ते दुबईत गेले होते. मुख्यमंत्री असल्याने त्यांना आपल्या दौऱ्याची कल्पना केंद्र सरकारला देणे अपेक्षित होते. त्यांनी तशी कल्पना केंद्र सरकारला दिली होती का? केंद्र सरकारने त्याबाबतचा काही अहवाल सादर केलाय का? या दौऱ्याचा तपशील उपलब्ध आहे का आणि या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी दुबई येथे जाऊन दाऊद इब्राहिम याची भेट घेतली होती. या भेटीचा उल्लेख आहे का? दाऊद इब्राहिमच्या या भेटीबाबत काय तपशील आहे? हा तपशील शरद पवार यांनी स्पष्ट केला आहे का? असे प्रश्न ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App