कसब्यातून देशात परिवर्तन सुरू झाल्याचा पवारांचा बारामतीत दावा; पण ममतांनी बंगालमध्ये आधीच घातला विरोधी ऐक्यात बिब्बा!!; त्याचे काय??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कसब्यातून देशात परिवर्तन सुरू झाल्याचा पवारांचा दावा; पण ममतांनी आधीच घातला विरोधी ऐक्यात बिब्बा!!, असे खरंच घडले आहे. Sharad Pawar claims defeat of BJP in kasba byelection will bring change wave in country, but Mamata banerjee already spoiled opposition unity in Bengal

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवावर भाष्य करताना देशात परिवर्तन सुरू झाल्याचा दावा केला. त्याचवेळी त्यांनी देशभरात भाजप कोणकोणत्या राज्यात नाही, त्याची यादीच सादर केली. या यादीत पश्चिम बंगालचे नाव आघाडीवर आहे. याच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र पवारांच्या दाव्या आधीच विरोधी ऐक्यात बिब्बा घातला आहे. मात्र, बारामतीच्या पत्रकार परिषदेत पवारांना याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला नाही आणि त्यामुळे त्यांनी त्याचे उत्तरही दिले नाही.

बारामतीतल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी कसब्यात भाजपचा पराभव झाला, ही देशात परिवर्तनाची सुरुवात आहे, असा दावा केला. तो दावा करताना शरद पवारांनी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगण, केरळ, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये भाजप नसल्याचा दावा केला आहे. कर्नाटकात देखील भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता मिळवली आगामी निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब दिसेल, असाही दावा केला. त्याचबरोबर महाराष्ट्रात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघामध्ये भाजपचा पराभव झाला. त्या पाठोपाठ कसब्यातही भाजपला पराभवाचा धक्का बसला. नारायण, शनिवार, सदाशिव पेठ येथेही भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले नाही, याकडे शरद पवारांनी लक्ष वेधले आणि देशात परिवर्तन सुरू झाल्याचा दावा केला.


ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य : म्हणाल्या- सूड उगवण्यावर माझा विश्वास नाही, नाहीतर अनेक माकप नेते तुरुंगात गेले असते


पण हा दावा करताना शरद पवारांनी ज्या पश्चिम बंगालचे नाव घेतले आहे, त्याच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र आपली आघाडी अथवा युती जनतेशी आहे. कोणत्याही दुसऱ्या राजकीय पक्षाशी नाही, असे सांगून विरोधी ऐक्यातच बिब्बा घातला आहे.

काहीच महिन्यांपूर्वी याच ममता बॅनर्जींनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटून विरोधी ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईत येऊन त्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना देखील भेटल्या होत्या. मात्र, आता पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सागरदिघी मतदारसंघात तृणमूळ काँग्रेसच्या उमेदवाराचा काँग्रेसच्या उमेदवाराने पराभव केला. त्यानंतर ममता बॅनर्जींचे विरोधी ऐक्याविषयीचे मत पूर्णपणे बदलून गेले आणि त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजप – कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेस हे तिघे एकत्र आल्याचा दावा करून त्यांच्याशी स्वबळावर मुकाबला करण्याचा चंग बांधल्याचे सांगितले. हाच ममता बॅनर्जींनी विरोधी ऐक्याला लावलेला सुरुंग आहे.

मात्र कसबा मतदारसंघातील पराभव हा देशातल्या परिवर्तनाची सुरुवात आहे, असा दावा करताना शरद पवारांना ममता बॅनर्जी यांनी विरोधी ऐक्याला लावलेल्या सुरुंगाविषयी पत्रकारांनी बारामतीत प्रश्न विचारला नाही. त्यामुळे त्यांनी त्याचे उत्तरही दिलेले नाही.

Sharad Pawar claims defeat of BJP in kasba byelection will bring change wave in country, but Mamata banerjee already spoiled opposition unity in Bengal

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात