शरद पवार मोठा झटका; नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांसह, पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांना पाठिंबा!


नागालँड राष्ट्रवादी अध्यक्षांनी दिल्लीत प्रफुल्ल पटेल आणि सुलीन तटकरेंची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्रही सादर केले.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांना आणखी एक झटका बसला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार अजित पवारांच्या गटात गेले आहेत. आमदारांसोबतच पदाधिकारीही अजित पवार यांना पाठिंबा देणार आहेत. Sharad Pawar big blow Along with seven MLAs of NCP in Nagaland office bearers support Ajit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितले की, नागालँडचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग ओडिओ यांनी दिल्लीत येऊन राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. नागालँड राष्ट्रवादीच्या निर्णयाची माहिती त्यांनी दिली. ओडिओ यांनी 7 आमदारांसह सर्व पदाधिकाऱ्यांना समर्थनाची शपथपत्रेही दिली.

यावर प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष बळकट करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देऊ, असे त्यांना आश्वासन दिले. प्रफुल्ल पटेल यांनी नागालँडच्या राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा युनिटलाही पूर्वीप्रमाणे काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

https://twitter.com/NCPSpeaks1/status/1681992720775286785

नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे- ‘नागालँड राष्ट्रवादी पक्षाची संपूर्ण राज्य कार्यकारिणी आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सखोल चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.’ नागालँड राष्ट्रवादीने अध्यक्ष वान्थुंग ओडिओ यांना राष्ट्रीय नेतृत्वाला या निर्णयाची माहिती देण्यासाठी अधिकृत केले आहे.

Sharad Pawar big blow Along with seven MLAs of NCP in Nagaland office bearers support Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात