नाशिक : काका + पुतण्यांचे कमी पडले “संस्कार”; म्हणून पुढच्या पिढ्यांवर काढावा लागला राग!!, असं म्हणायची वेळ पवार काका + पुतण्यांच्या कमी पडलेल्या “राजकीय संस्कारांमुळे” आली. एरवी खासदार सुप्रिया सुळे आपल्या आई, वडिलांच्या संस्कारांच्या आणि यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय संस्कारांच्या बाता मारत असतात. आपल्यावर आई, वडिलांनी कसे चांगले संस्कार केले, त्यामुळे आपण सुसंस्कृत राजकारण कसे करतो, याची वर्णने करत फिरतात. पण प्रत्यक्षात पवार काका + पुतणे आपल्या पुढच्या पिढ्यांवर “राजकीय संस्कार” करण्यात कमी पडले हे त्यांच्या तोंडाने त्यांनी वेगवेगळ्या वेळी कबूल केले.
राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या खऱ्या – खोट्या फुटी नंतर पवार कुटुंब जरी “आतून” एक राहिले असले, तरी जाहीरपणे त्यांना एकमेकांचे वाभाडे काढावे लागताहेत, हे पवार काका + पुतण्यांच्या वक्तव्यांमधून समोर आले.
पार्थला कवडीची किंमत नाही
आपण आपला नातू पार्थ पवार याला कवडीचीही किंमत देत नाही, असे वक्तव्य शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीनंतर केले होते. पार्थ पवार अपरिपक्व असल्याची टीका त्यांनी केली होती. पार्थ पवारांना मावळ मधून उमेदवारी देण्याचा अजितदादांचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंगलट आला. पवार घराण्यातला पहिला पराभव पार्थ पवारच्या रूपाने पाहावा लागला, याचा राग शरद पवारांनी त्यावेळी काढून घेतला होता.
रोहितने नाक खुपसू नये
आज अजित पवारांनी रोहित पवार यांच्यावर राग काढला. सुरज चव्हाणच्या फेरनियुक्ती वरून रोहित पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीकेची जोड उठवली होती. त्यावरून अजित पवारांनी रोहित पवारांवर आज राग काढला. त्यांनी स्वतःचा पक्ष वाढवण्याचे बघावे. दुसऱ्यांच्या पक्षांमध्ये नाक खुपसू नये. काही लोकांना आपण फार मोठे नेते झाल्यासारखे वाटायला लागले आहे. सगळ्या महाराष्ट्राचा मक्ता आपल्याकडेच आहे, असे त्यांना वाटतेय. पण त्यांनी स्वतःच्या पक्षात काय चाललंय ते बघावे. दुसऱ्यांच्या पक्षांमध्ये नाक खुपसू नये, अशा परखड शब्दांमध्ये अजित पवारांनी रोहित पवारांना झापले.
संस्कार कमी पडल्याची अप्रत्यक्ष कबुली
पवार काका + पुतण्यांच्या या वक्तव्यांमधून अप्रत्यक्षपणे त्यांचेच पुढच्या पिढ्यांवरचे “राजकीय संस्कार” कमी पडल्याचे स्पष्ट झाले. त्या दोघांनी पुढच्या पिढ्यांवर योग्य ते संस्कार केले असते, तर पुढच्या पिढ्यांच्या राजकीय वर्तणुकी ठीकठाक राहिल्या असत्या. मग दोघांनाही पुढच्या पिढ्यांवर वेगवेगळ्या शब्द फेकी करून राग काढावे लागले नसते. पण पवार काका + पुतणे पुढच्या पिढ्यांवर संस्कार करण्यात कमी पडले. त्यामुळे पुढच्या पिढ्यांच्या राजकीय वर्तणुकी बिघडल्या म्हणून पार्थ पवार आणि रोहित पवार वाटेल तसे बडबडायला लागले. म्हणूनच पवार काका + पुतण्यांना जाहीरपणे आपल्याच पुढच्या पिढ्यांचे वाभाडे काढावे लागल्याचे उघड झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App