विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वीय साहाय्यक म्हणून काम केलेले माजी प्रशासकीय अधिकारी शक्ती सिन्हा (वय ६४) यांचे निधन झाले. होते. सिन्हा यांच्या मागे पत्नी सुरभी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांची पत्नी सुरभी याही निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.Shaki sinha no more
शक्ती सिन्हा यांचा जन्म १९५७ मध्ये बिहारमध्ये झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या आयपीएस तुकडीतील पोलिस अधिकारी होते. सिन्हा हे १९७९च्या तुकडीतील प्रशासकीय अधिकारी होते.
नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररीचे ते माजी संचालक होते. त्यांनी १९९६ ते १९९९ या कालावधीमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत काम केले होते. ‘वाजपेयी ः द इयर्स दॅट चेंज्ड इंडिया’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App