वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी आजपासून पुन्हा संधी आहे. कारण सार्वभौम गोल्ड बाँड म्हणजे एसजीबी (Sovereign Gold Bond)योजना सुरु आहे. या माध्यमातून तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करता येणार आहे. SGB will be available for investment till 4th March 2022
सार्वभौम सुवर्ण बाँड योजना ५ दिवसांसाठी खुली राहणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोन्याची किंमत ५१०९ रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. तुम्ही यामध्ये ४ मार्चपर्यंत गुंतवणूक करू शकता. सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे. दीर्घ कालावधीची सोव्हेरेन गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक ही नेहमी फायद्याची ठरते.
सोव्हेरन गोल्ड बॉंडद्वारे सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला, सुरक्षित आणि उत्तम परतावा देणारा पर्याय आहे कारण सोन्याच्या दागिन्यांच्या बाबतीत कोणतेही शुल्क आकारले जात नाही. सोव्हेरन गोल्ड बॉंडद्वारे भौतिक सोन्यापासून डिजिटल किंवा कागदी सोन्यामध्ये गुंतवणूक हस्तांतरित करणे हे सरकारसाठी एक मोठे यश आहे. यातून सरकारने २०१५मध्ये स्थापनेपासून ३२००० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App