विशेष प्रतिनिधी
तिरुवनंतपुरम : केरळच्या कलिकत विद्यापीठात काळे फुगे, सावरकर विरोधात SFI ची निदर्शने; राज्यपालांनी धू धू धुतले!! SFI agitation
त्याचे झाले असे :
केरळच्या कलिकट विद्यापीठात सिनेटची बैठक होती. त्या बैठकीला कुलपती या नात्याने राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हजर राहणार होते. नियोजित कार्यक्रमानुसार राज्यपाल सिनेट बैठकीला हजर राहिले, पण ते विद्यापीठात येत असताना त्यांना विद्यापीठाच्या आवारात मोठे फलक दिसले. त्यावर we want chancellor, not savarkar असे काळ्या अक्षरात लिहिले होते. राज्यपालांच्या दौऱ्याच्या वेळातच SFI या कम्युनिस्टांच्या विद्यार्थी संघटनेने तेच फलक घेऊन हातात काळे फुगे घेत निदर्शने केली.
वास्तविक राज्यपालांच्या विद्यापीठ दौऱ्यात फक्त सिनेटची बैठकच होती. त्यांचा बाकी कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम नव्हता, पण तरीदेखील कम्युनिस्टांच्या SFI विद्यार्थी संघटनेने आगाऊपणाने we want chancellor, not savarkar अशी औचित्यभंग करणारी निदर्शने केली. त्यावरून राज्यपालांनी संबंधित संघटनेला जाहीरपणे झापले.
वास्तविक सावरकर या मुद्द्यावर आज चर्चा करायचे काहीच कारण नव्हते. मलाही त्या विषयावर बोलायचे नव्हते. पण we want chancellor, not savarkar हा कसला प्रकार आहे??, हे विद्यार्थ्यांच्या डोक्यात येतेच कसे??, सावरकर काय देशद्रोही होते??, सावरकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात स्वतःचा कधीच विचार केला नाही. कुटुंबाचा विचार केला नाही. त्यांनी कायम देशहिताचा विचार केला. तुमचे त्यांच्याशी काही मतभेद असतील म्हणून कुठेही आणि केव्हाही ते व्यक्त करायचे हे कुठली सभ्यता??, अशा शब्दांमध्ये राज्यपाल अर्लेकर यांनी संबंधित विद्यार्थी संघटनेला झापले. शिक्षण व्यवस्थेत प्रत्येक ठिकाणी राजकारण घुसवून खेळ चालवला जात असेल, तर तो तुम्ही रोखले पाहिजे, असे त्यांनी कलिगत विद्यापीठाच्या कुलगुरूंना स्पष्ट शब्दांत सुनावले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App