वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. 34 जागांसाठी मतदान होणार आहे. 81 लाख जण 268 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. त्यामध्ये 36 महिला उमेदवारांचा समावेश आहे. Seventh phase of polling begins in West Bengal
सहा मतदारसंघात जोरदार लढती होत आहेत. त्यात अनुक्रमे दक्षिण दिनाजपुर 6, मालदा 6, मुर्शिदाबाद 9, पाश्चिम बर्धमान 9 आणि कोलकतात 4 मतदारसंघाचा समावेश आहे.
भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार लढत होत असून प्रचारामुळे वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, या टप्प्यात कोरोनामुळे प्रचार थंडावला आहे. प्रचारात कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याने निवडणूक आयोगाने रोड शो तसंच वाहनांसोबत रॅलीवर बंदी घातली होती. ५०० हून अधिक लोक सार्वजनिक ठिकाणी येण्यावर बंदी आणली.
दरम्यान, देशात कोरोनाचे संकट वाढत असल्याने कोरोना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐनवेळी दौरा रद्द केला . परंतु त्यांनी ट्विट करत लोकांना मतदान करण्याचं आवाहन केले आहे. नियमांचं पालन करण्याची विनंती केली आहे.
दोन मे रोजी निकाल जाहीर
पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी आठवा आणि शेवटचा मतदानाचा टप्पा आहे. 2 मे रोजी पश्चिम बंगालसोबत आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील निवडणूक निकाल जाहीर होतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App