विशेष प्रतिनिधी
मुरादाबाद : उत्तर प्रदेशच्या मुरादाबादच्या एका खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. ब्राइट स्टार असे त्या रुग्णालयाचे नाव आहे. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहा जणांचाच मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.seventeen people died due to lack of oxygen in UP
इस्रोतील शास्त्रज्ञ रजत शर्मा यांनी ब्राइट स्टार रुग्णालयात १७ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. मृतांच्या नातेवाइकांनी मृतदेहासाठी नाव नोंदवले असून त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या देखील आहेत, असे रजत शर्मा यांनी म्हटले आहे.
रजत शर्मा यांच्या वडिलांचे याच रुग्णालयात निधन झाले. त्यांचे वडील कोरोना पॉझिटिव्ह होते आणि त्यांच्यावर येथे २० एप्रिलपासून उपचार सुरू होते. काल डॉक्टरांनी वडिलांची तब्येत चांगली असल्याचे सांगितले होते आणि दोन तीन दिवसांत घरी सोडण्यात येईल,
असे सांगितले होते. परंतु आज सकाळी रुग्णालयात गेले असता वडिलांचा मृत्यू झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.आज पहाटे तीनच्या सुमारास अचानक ऑक्सिजनचा पुरवठा थांबला. त्यानंतर एकाएका रुग्णांचा मृत्यू होऊ लागला.
सकाळी नातेवाईक रुग्णालयात पोचले असता त्यांना मृत्यूची वार्ता देण्यात आली. ऑक्सिजन पुरवठा विस्कळित झाल्यानेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App