सिक्कीमच्या नाथुला येथे हिमस्खलनात सात पर्यटकांचा मृत्यू, अनेक जखमी

ICE Melting

बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.;  हिमस्खलनादरम्यान १५० हून अधिक पर्यटक या परिसरात असल्याची माहिती मिळाली आहे.

विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी : सिक्कीममधील नाथुला पर्वताच्या खिंडीत आज झालेल्या हिमस्खलनात सात पर्यटकांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. हिमस्खलनानंतर अनेक पर्यटक बर्फात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. हिमस्खलनादरम्यान १५० हून अधिक पर्यटक या परिसरात असल्याची माहिती मिळाली आहे. Seven tourists killed many injured in avalanche in Sikkim Nathula

गंगटोक ते नाथुला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू रोडवर १५व्या मैलावर झालेल्या हिमस्खलनात सात पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण बर्फाखाली अडकल्याची भीती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हिमस्खलन झाले. यात जखमी झालेल्या सात जणांचा जवळच्या लष्करी रुग्णालयात मृत्यू झाला. यामध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५० हून अधिक पर्यटक अजूनही १५ मैलांच्या पुढे अडकून पडले आहेत. दरम्यान, बर्फात अडकलेल्या सुमारे ३० पर्यटकांची सुटका करण्यात आली असून त्यांना गंगटोक येथील एसटीएनएम हॉस्पिटल आणि सेंट्रल रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Seven tourists killed many injured in avalanche in Sikkim Nathula

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात