जम्मू-काश्मी्रमध्ये दहशतवादी संघटनेचा म्होरक्या चकमकीत ठार, सात दहशतवाद्यांचाही खातमा


विशेष प्रतिनिधी 

श्रीनगर :  जम्मू-काश्मीsरमध्ये शोपियाँ व पुलवामा जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या चकमकीत सात दहशतवाद्यांना ठार करण्यास सुरक्षादलांना यश मिळाले आहे. यात ‘अन्सार गझवातुल हिंद’चा मुख्य म्होरक्याचाही समावेश आहे.seven terrorist killed in Jammu and kashmir

पुलवामा जिल्ह्यातील त्राल शहरातील नौबाग येथे झालेल्या चकमकीत ‘अन्सार गझवातुल हिंद’ या स्थानिक दहशतवादी संघटनेच्या म्होरक्या इम्तियाज अहमद शाह याच्यासह दोन दहशतवादी ठार झाले. गोळीबाराच्या ठिकाणाहून शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.



शोपियाँ शहरात काल रात्री झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले तर तेवढेच जवान जखमी झाले. जान मोहल्ल्यातील धार्मिक स्थळाच्या आत दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. लष्कर, जम्मू-काश्मीदर पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलाने या भागाला वेढा दिला.

दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन सुरक्षा दलांनी केले. मात्र हा प्रयत्न फोल ठरला. यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार सुरू केला. याला चोख प्रत्युत्तर देत पाच दहशतवाद्यांना ठार केले.

seven terrorist killed in Jammu and kashmir

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!