खळबळजनक : पाकिस्तानात सहकारी शिक्षिकेने स्वप्नात ईशनिंदा केल्याचे पाहिले, संतापून तीन जणींनी मिळून केली हत्या

पाकिस्तानमध्ये ईशनिंदेच्या नावाखाली आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे. मात्र यावेळी खून करणाऱ्या महिलांचा दावा आहे की, त्यांनी स्वप्नात शिक्षिकेला ईशनिंदा करताना पाहिले होते. पाकिस्तान पोलिसांनी बुधवारी सांगितले की, मुलींच्या धार्मिक शाळेत एका शिक्षिकेची तिची महिला सहकारी आणि दोन विद्यार्थिनींनी हत्या केली. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या देशाच्या अत्यंत पुराणमतवादी उत्तर-पश्चिम खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान येथे मंगळवारी ही घटना घडली.Sensational In Pakistan, a co-teacher saw in a dream blasphemy, three murdered in anger


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये ईशनिंदेच्या नावाखाली आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे. मात्र यावेळी खून करणाऱ्या महिलांचा दावा आहे की, त्यांनी स्वप्नात शिक्षिकेला ईशनिंदा करताना पाहिले होते. पाकिस्तान पोलिसांनी बुधवारी सांगितले की, मुलींच्या धार्मिक शाळेत एका शिक्षिकेची तिची महिला सहकारी आणि दोन विद्यार्थिनींनी हत्या केली. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या देशाच्या अत्यंत पुराणमतवादी उत्तर-पश्चिम खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान येथे मंगळवारी ही घटना घडली.

पोलिसांनी सांगितले की, दोन विद्यार्थिनी आणि एका शिक्षिकेने सफुरा बीबीला शाळेच्या मुख्य गेटवर गाठून तिच्यावर चाकू आणि काठ्यांनी हल्ला केला. यादरम्यान गळा चिरल्याने तिचा मृत्यू झाला,” असे पोलीस अधिकारी सगीर अहमद यांनी एएफपीला सांगितले.



मुख्य संशयित महिलेने दोन भाच्यांसोबत आखला कट

पोलिसांनी सांगितले की, मुख्य संशयित ही पीडितेची सहकारी शिक्षिका असून तिने जामिया इस्लामिया फलाहुल बिनत स्कूलमध्ये शिकणाऱ्या दोन भाच्यांसोबत कट आखला होता. मुलींनी पोलिसांना सांगितले की, मृत शिक्षिकेने प्रेषितांची निंदा केल्याचे स्वप्न एका नातेवाईकाने पाहिले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्य संशयित उमरा अमानचे पीडितेशी वैयक्तिक वैर आहे का, याचाही ते तपास करत आहेत.

मदरसे म्हणून ओळखल्या जाणार्‍या धार्मिक शाळांनी पाकिस्तानमधील लाखो गरीब मुलांसाठी दीर्घकाळ जीवनवाहिनी म्हणून काम केले आहे. परंतु समीक्षकांचे म्हणणे आहे की, गणित आणि विज्ञान यासारख्या मुख्य विषयांऐवजी कुराणच्या पठणास प्रोत्साहन देणारे धर्मांध मौलवी विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश करतात.

ईशनिंदा करणाऱ्या आरोपींची यापूर्वीही हत्या

ईशनिंदा हा पाकिस्तानमध्ये अतिशय प्रक्षोभक मुद्दा आहे. अधिकार गटांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या ईशनिंदा कायद्यांचा वापर अनेकदा वैयक्तिक सूडबुद्धीसाठी केला जातो. गेल्या वर्षी, पाकिस्तानमध्ये काम करणाऱ्या एका कारखान्याच्या श्रीलंकन ​​व्यवस्थापकाला ईशनिंदा केल्याचा आरोप केल्यानंतर जमावाने बेदम मारहाण करत ठार केले आणि त्याला जाळले होते.

सेंटर फॉर सोशल जस्टिस – अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी वकिली करणारा एक स्वतंत्र गट म्हणतो की, गेल्या वर्षी किमान 84 लोकांवर ईशनिंदेचा आरोप ठेवण्यात आला होता आणि अशाच आरोपांवरून जमावाकडून तीन जणांची हत्या करण्यात आली होती.

Sensational In Pakistan, a co-teacher saw in a dream blasphemy, three murdered in anger

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात