विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रणनितीकार प्रशांत किशोर यांची कॉँग्रेससोबतची जवळीक वाढली आहे. रणनितीकार म्हणून काम करायचे नाही असे ठरविल्यावर नवीन जबाबदारी घेणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. कॉँग्रेसमध्ये एकेकाळचे सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची जागा घेण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे. मात्र, वरिष्ठ कॉँग्रेस नेत्यांनीच किशोर यांना पटेल यांची जागा देण्यास विरोध केला आहे.Senior Congress leaders opposing to replace Prashant Kishor with Ahmed Patel, should work as a strategist
सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करणारे अहमद पटेल हे कॉँग्रेसमधील गांधी कुटुंबियांनंतर सर्वशक्तीमान नेते होते. एका अर्थाने कॉँग्रेस पक्ष तेच चालवित होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले. पटेल यांची जागा घेण्याची प्रशांत किशोर यांची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. राहूल गांधी यांचे अहमद पटेल बनून कॉँग्रेस चालविण्याची त्यांची इच्छा आहे.
प्रशांत किशोर कॉँग्रेसमध्ये सामील झाल्यास त्यांना काय जबाबदारी द्यायची याबाबत चर्चा करण्यासाठी काही दिवसांपूर्वी कॉँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणिस आणि राहूल गांधी यांचे निकटवर्तीय व्ही. सी. वेणुगोपाल यांनी एक बैठक बोलावली होती. प्रियांका गांधी, एके अँटनी, जयराम रमेश, दिग्विजय सिंह आणि तारिक अन्वर हे या बैठकीला उपस्थित होते.
त्याचबरोबर कॉँग्रेसमधील अन्य नेत्यांचेही म्हणणे जाणून घेण्यात आले. सर्वच नेत्यांनी प्रशांत किशोर कॉँग्रेसमध्ये सामील झाल्यास त्यांना विशेष दर्जा देण्यास विरोध केला आहे. निवडणूक रणनीतिकारांना राजकीय व्यवस्थापकाची भूमिका दिली जाऊ शकत नाही. त्यांनी सध्याच्या पक्षीय व्यवस्थेअंतर्गत काम केले पाहिजे. पक्ष कार्यकर्ता म्हणून आपले कौशल्या सिध्द करून दाखविले पाहिजे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉँग्रेससाठी राजकीय रणनितीकार म्हणून प्रशांत किशोर काम करत होते. यावेळी तृणमूल कॉँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर नेते बाहेर पडत होते. भारतीय जनता पक्ष दोनशेपेक्षा जास्त विधानसभेच्या जागा मिळतील, असा दावा करत होते. यावेळी प्रशांत किशोर म्हणाले होते की भाजपाला शंभरपेक्षा जास्त जागा मिळाल्यास आपण निवडणूक रणनितीकार म्हणून काम करणे सोडून देऊ.
प्रशांत किशोर यांचा विश्वास सार्थ ठरला. ममता बॅनर्जी यांचा मोठा विजय झाला. भाजपाला दोन आकडी संख्या ओलांडता आली नाही. मात्र, तरीही प्रशांत किशोर यांनी निवडणूक रणनितीकार म्हणून करत असलेले काम सोडण्याची घोषणा केली होती.
आयपॅक या आपल्या निवडणूक रणनिती संस्थेची जबाबदारी दुसऱ्या सहकाऱ्यांकडे सोपविण्यासाठी हिच योग्य वेळ असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांची राहूल गांधी यांच्याशी जवळीक वाढली होती. मात्र, कॉँग्रेससाठी रणनितीकार म्हणून काम करण्यापेक्षा पक्षसंघटनेत मोठे पद मिळविण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे. यापूर्वीही नितीश कुमार यांच्या जनता दलाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. परंतु, नितीश कुमार यांच्याशी मतभेद झाल्यानंतर हे पद सोडले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App