वृत्तसंस्था
बर्लिन : भारतात सरकार आणि प्रशासनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर एवढा उत्तम रीतीने करतो आहोत की केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकार यांच्यात जवळजवळ 10000 सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. लोकांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. आता कोणत्याही पंतप्रधानाला असे म्हणावे लागणार नाही की मी दिल्लीहून 1.00 रुपया पाठवतो पण लोकांपर्यंत त्यातले फक्त 15 पैसे पोहोचतात, अशा शब्दात मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीतील भारतीयांपुढे देशातील बदलाचा लेखाजोखा मांडला. Sends 1 rupee from Delhi, only 15 paise arrives
#WATCH | Today the way technology is being included in governance in India, it shows the political will of New India…Now no PM will have to say that I send Re 1 from Delhi but only 15 paise reaches (people): PM Modi in Berlin, Germany pic.twitter.com/JoOh03NN5o — ANI (@ANI) May 2, 2022
#WATCH | Today the way technology is being included in governance in India, it shows the political will of New India…Now no PM will have to say that I send Re 1 from Delhi but only 15 paise reaches (people): PM Modi in Berlin, Germany pic.twitter.com/JoOh03NN5o
— ANI (@ANI) May 2, 2022
Earlier there was one nation but two constitutions. It took seven decades to implement one nation and one constitution. It has been implemented only now: PM Narendra Modi addresses members of the Indian community in Berlin, Germany pic.twitter.com/vfU29tBkXd — ANI (@ANI) May 2, 2022
Earlier there was one nation but two constitutions. It took seven decades to implement one nation and one constitution. It has been implemented only now: PM Narendra Modi addresses members of the Indian community in Berlin, Germany pic.twitter.com/vfU29tBkXd
जर्मनीतील भारतीयांना पंतप्रधान मोदी यांनी बर्लिनमधील पोस्ट डॅमर प्लाट्स थिएटरमध्ये संबोधित केले. भारतातील बदलासंदर्भात त्यांनी सविस्तर विवेचन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात राजकीय इच्छाशक्तीने खूप वेगाने बदल झाले आहेत. भारतात इंटरनेट डेटा खूप स्वस्त आहे. त्यामुळे 45 कोटींहून अधिक लोक आता बँक सेवा इंटरनेट द्वारे स्वीकारतात. केंद्र राज्य आणि स्थानिक सरकार यांच्यात तब्बल 10000 च्या आसपास सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत.
यातून सरकारचा पैसा तर वाचतोच. परंतु लोकांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय सेवा उपलब्ध होतात. वेळ वाचतो. श्रम वाचतात. आता तंत्रज्ञानाचा वापर सर्वदूर पोहोचल्यामुळे त्याचे लाभ होऊन प्रगतीने अधिक वेग पकडला आहे. नव तंत्रज्ञानाचे लाभ समाजातल्या सर्व स्तरांवर पोहोचले आहेत. इथून पुढे देशाच्या कोणत्याही पंतप्रधानाला मी दिल्लीहून 1.00 रुपया पाठवतो पण त्यातले फक्त 15 पैसेच सामान्य लोकांपर्यंत पोहोचतात असे म्हणावे लागणार नाही. करण कोणतीही सरकारी मदत असो अथवा मोबदला असो तो थेट जनतेच्या बँक खात्यात जमा होतो. पंतप्रधान सन्मान निधी पासून ते आरोग्य सुविधा पर्यंत अनेक सेवांचा यात समावेश होतो आहे.
देशातील सामाजिक बदलांविषयी देखील मोदींनी यावेळी भाषेत केले. देशात 70 वर्षांपूर्वी राजकीय ऐक्य झाले असले तरी दोन राज्यघटना अस्तित्वात होत्या. 70 वर्षांनंतर ही परिस्थिती बदलून आता संपूर्ण देशभर एकच एक राज्यघटना लागू केली आहे, असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीर मधून 370 कलम हटविण्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App